युद्धाच्या १८ व्या दिवशी इराणला तीन मोठे धक्के, इराणने सादर केला हस्ताक्षराचा हा पुरावा

इराणच्या या युद्धाच्या १८ व्या दिवशी सर्वात मोठी घटना घडली आहे. इराण आधीच सुप्रीम लीडर आयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे गंभीर संकटाशी झुंजत आहे. आता इराणला तीन मोठे धक्के बसले आहेत.

युद्धाच्या १८ व्या दिवशी इराणला तीन मोठे धक्के, इराणने सादर केला हस्ताक्षराचा हा पुरावा
Khamenei's Advisor Ali Larijani and Commander Soleimani
| Updated on: Mar 17, 2026 | 8:24 PM

पश्चिम आशियातील युद्धात इस्राईलने आता इराणच्या मिलिट्री कमांडवर तगडा प्रहार केला आहे. इस्राईलने १२ तासात इराणच्या तीन मोठे टार्गेटवर हल्ला केला आहे. इस्राईलचा दावा आहे की या हल्ल्यात इराणचा डिफेन्स आणि प्लानिंग क्षमतेवर निर्णायक घाव घातला आहे. इस्राईलच्या सैन्य IDF ने दावा केला आहे की या हल्ल्यात अली खामेनेईचे सल्लागार अली लारिजानी यांचा मृ्त्यू झाला आहे. दुसरा हल्ला कमांडर सुलेमानी यांच्यावर केला आहे. इस्राईलने दावा केला आहे की घोलामरेजा सुलेमानी याना एका टार्गेट हल्ल्यात ठार केले आहे.तिसरा आणि निर्णायक घाव इराणच्या नेव्हीवर केला आहे.

इराणच्या या युद्धाच्या १८ व्या दिवशी सर्वात मोठी घटना घडली आहे. इराण आधीच सुप्रीम लीडर आयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूमुळे गंभीर संकटाशी झुंजत आहे. इस्राईलची संरक्षण मंत्री काट्ज यांनी या हल्ल्यात खामेनेईचे सल्लागार अली लारिजानी आणि कमांडर सुलेमानी यांचा खात्मा झाल्याचे स्पष्ट केले आहे. आणि हे इराणचे नेतृत्व कमजोर करण्याच्या निर्णायक पाऊल म्हटले आहे.

१ – पहिला धक्का –  लारिजानीवर मिडनाईट स्ट्राईक –

इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येनंतर लारिजानी इराणचे डी-फॅक्टो म्हणजे असली नेते बनले होते असे इस्राईली सैन्याने म्हटले होते. इराणच्या प्रशासनाच्या नेतृत्वात सर्वात वरिष्ठ आणि अनुभवी असलेल्या अली लारिजानी यांना खामेनेई यांचे जवळचे म्हटले जात होते. अलिकडेच कुद्स डे रॅलीत लारिजानी यांनी उघडपणे सहभागी होत अमेरिका-इस्राईलला उघड आव्हान दिले होते. त्यानंतर इस्राईल त्यांच्या मागावर होते. लारिजानी यांनी इराणच्या प्रशासनाचे असली नेते म्हणून आपली स्थिती मजबूत केली आणि इस्राईल आणि या क्षेत्रातील अन्य देशांच्या विरोधात लढाईचे नेतृत्व केले होते असे इस्राईलने म्हटले आहे.

येथे पोस्ट पाहा –


मात्र, इराणने लारिजानी यांच्या मृत्यूचा अधिकृतपणे दुजारो दिलेला नाही. मात्र, त्याऐवजी लरिजानीच्या सोशल मीडियावर त्यांच्या हाताने लिहिलेला एक मॅसेज शेअर केला आहे. ज्यास काही लोकांनी त्यांच्या जीवंत असल्याचा पुरावा मानला आहे. या हातानी लिहिलेल्या संदेशात लारिजानी यांनी इराणी नौसैनिकांच्या मृत्यूबद्दल आपली प्रतिक्रीया लिहीली आहे. आणि यास आंतरराष्ट्रीय दमणकाऱ्याच्या विरोधात संघर्षाच्या दरम्यान एका साहसी राष्ट्राच्या शहीदाचा हिस्सा म्हटले आहे. त्यांनी सांगितले की मेलेल्या लोकांची आठवण इराणी लोकांच्या हृदयात कायम जीवंत राहिल.

दुसरा धक्का – बसिज कमांडर घोलामरेजा सुलेमानी यांची हत्या

गेल्या १२ तासात इस्राईलने दुसरा प्रहार बसिज कमांडर घोलामरेजा सुलेमानी यांच्यावर केला. बसिज फोर्स IRGC ची पॅरामिलिट्री युनिट आहे. जी अंतर्गत बंडाळींना ठेचण्यासाठी असते. बसिज फोर्स इराणच्या घरगुती सुरक्षेच्या मजबूतीचा आधार आहे.याच्या प्रमुखाला मारणे म्हणजे इराणच्या अंतर्गत स्थिरतेला मोठा हादरा मानला जात आहे.

तिसरा धक्का – इराणचे नौदल

तिसरा प्रहार इराणच्या नौदलावर करण्यात आला आहे. इस्राईलने तेहराणच्या नव्या हल्ल्यात IRGC Navy चे मुख्यालय उद्धवस्त केले आहे. इराणचे १३०० हून अधिक जण ठार झाले आहेत, लेबनॉनमध्ये ८५० जण ठार झाले आहेत. इस्राईलच्या लेबनॉनवरील हल्ल्याने तेथील १० लाख लोक विस्थापित झाले आहेत. इस्राईलची काही सैनिक दक्षिण लेबनॉनमध्ये घुसल्याने आता इस्राईल मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचे म्हटले आहे.

Follow Us