AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | हमास तासाभरात इस्रायलच्या सर्व बंधकांना सोडण्यास तयार, पण….

Israel-Hamas War | बंधकांना सोडण्यास तयार, पण हमासने इस्रायलसमोर काय अट ठेवलीय? कुठल्या हल्ल्यानंतर हमासने तडजोडीची तयारी दाखवलीय? सध्या इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे.

Israel-Hamas War | हमास तासाभरात इस्रायलच्या सर्व बंधकांना सोडण्यास तयार, पण....
israel pm
| Updated on: Oct 18, 2023 | 10:05 AM
Share

जेरुसलेम : हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबरला इस्रायलवर भीषण दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यात 1 हजारपेक्षा जास्त इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. हमासच्या दहशतवाद्यांनी एकाचवेळी 5 हजार रॉकेट्स इस्रायलमध्ये डागले. त्यामुळे रॉकेट हल्ला रोखणारी आर्यन डोम यंत्रणा सुद्धा फेल ठरली. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला करताना मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. अत्यंत क्रूर वर्तन केलं, इस्रायली जनतेवर अत्याचार केले. हमासचे हे दहशतवादी अनेक इस्रायली नागरिकांना बंधक बनवून आपल्यासोबत घेऊन गेले. हमासनी त्यांच्या ताब्यात असलेल्या बंधकांचे काही फोटो रिलीज केले आहेत. हमासने तडजोड करण्याच्या उद्देशाने इस्रायली नागरिकांना बंधक बनवल होतं. इस्रायली तुरुंगात बंद असलेल्या हमासच्या दहशतवाद्यांची सुटका करण हा हमासचा उद्देश होता. आता हमास या दहशतवाद्यांची सुटका करण्यास तयार असल्याची माहिती आहे. एका न्यूज एजन्सीने हे वृत्त दिलय.

इस्रायलकडून गाझा पट्टीत सातत्याने बॉम्ब वर्षाव सुरु आहे. हमासचे अनेक तळ उद्धवस्त करण्यात ये आहेत. आता हमास बंधकांच्या सुटकेसाठी तयार आहे. फक्त त्यांनी इस्रायलसमोर एक अट ठेवलीय. बॉम्ब हल्ले बंद करण्याची त्यांनी मागणी केलीय. हमासच्या एका नेत्याने न्यूज एजन्सीशी बोलताना हे सांगितलं. गाझा पट्टीत इस्रायली लष्कराने आपली कारवाई थांबवली, तर तासाभरात सर्व बंधकांची सुटका करु, असं हमासच्या या नेत्याने म्हटलं आहे. इस्रायलच म्हणणं काय?

गाझामधील रुग्णालयावर काल भीषण हल्ला झाला. यात 500 नागरिक ठार झाले. त्यानंतर हमासकडून ओलिसांच्या सुटकेसाठी लगेच ही अट ठेवण्यात आली. इस्रायलने हॉस्पिटलवरील रॉ़केट हल्ल्याचा आरोप फेटाळून लावलाय. इस्लामिक जिहाद दहशतवादी संघटनेने डागलेल रॉकेटच या हॉस्पिटलवर पडलं असं इस्रायलच म्हणणं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?