AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gaza Hospital Attack | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले, इस्रायल दौऱ्यावर निघताच सगळी योजना मिळाली धुळीस

Gaza Hospital Attack | 'या' देशांच्या राष्ट्रप्रमुखांचा ज्यो बायडेन यांना भेटण्यास साफ नकार. इस्रायल दौऱ्यावर येत असताना अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना धक्का बसला आहे. गाझाच्या हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळे सगळ गणित बदललं.

Gaza Hospital Attack | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष संतापले, इस्रायल दौऱ्यावर निघताच सगळी योजना मिळाली धुळीस
America president joe biden on Israel Visit
| Updated on: Oct 18, 2023 | 8:56 AM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज 11 वा दिवस आहे. एका घटनेमुळे युद्धाच सर्व समीकरण आता बदलू शकतं. मंगळवारी संध्याकाळी ह्दय पिळवटून टाकणारी एक घटना घडली. मध्य गाजाच्या अल अहली हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला झाला. यात 500 निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला. हा हल्ला इस्रायलने केल्याचा आरोप आहे. मात्र इस्रायलने हा आरोप फेटाळून लावला आहे. त्यांनी हमासच्या दहशतवाद्यांवरच आरोप केलाय. हमासच्या दहशतवाद्यांनी डागलेल रॉकेट दिशा भरकटल व रुग्णालयावर जाऊन पडलं, असं इस्रायलच म्हणणं आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अनेकांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. पॅलेस्टाइनमधील अनेकांनाी या रुग्णालयात आश्रय घेतला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इस्रायल दौऱ्यावर रवाना होत असताना ही घटना घडलीय.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या इस्रायल दौऱ्यावर याचा परिणाम झालाय. बायडेन आज इस्रायल आणि मिडिल इस्टच्या दौऱ्यावर आहेत. इस्रायलला समर्थन देण्याच्या उद्देशाने बायडेन आज येत आहेत. पण गाझाच्या हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांच्या सर्व योजना धुळीस मिळाल्या आहेत. बायडेन इस्रायलयनंतर जॉर्डनला जाणार होते. तिथे ते अब्दुल्ला द्वितीय, इजिप्तचे राष्ट्रपती अब्दुल फतह अल सीसी यांच्यासोबत चर्चा करणार होते. पॅलेस्टाइनचे प्रशासक प्रमुख मोहम्मद अब्बास यांना सुद्धा ते भेटणार होते. पण बायडेन यांची योजना आता फसली आहे. जॉर्डनने किंग अब्दुल्ला, सीसी, अब्बास यांच्यासोबतची बायडेन यांची भेट रद्द केली आहे. तिन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी बायडेन यांना भेटण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. हॉस्पिटल हल्ल्यानंतर बायडेन काय म्हणाले?

“अल अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यामुळे मी खूप दु:खी आहे. मी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी चर्चा केली. मी माझ्या टिमला रिपोर्ट सादर करण्यास सांगितला आहे. रुग्णालयावर झालेल्या हल्ल्याबाबत अमेरिका खूप कठोर आहे. पेंटागॉनने इस्रायलला युद्ध कायद्याच पालन करण्यास सांगितलं आहे” असं बायडेन म्हणाले. “ही बातमी ऐकल्यानंतर मी लगेच जॉर्डनचे राजे अब्दुल्ला द्वितीय आणि इस्रायली पंतप्रधानांसोबत चर्चा केली” असं बायडेन यांनी सांगितलं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.