Israel Attacks Iran: इस्त्रायलकडून इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवर हल्ला, अमेरिकेकडून पहिली प्रतिक्रिया
Israel Iran War News : इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यास ऑपरेशन राइजिंग लायन नाव दिले आहे. इराणमधील अण्वस्त्र केंद्र, अण्वस्त्र शास्त्रज्ञ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम याला इस्त्रायलने लक्ष्य केले.

Israel Iran War News : इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आहे. शुक्रवारी पहाटे केलेल्या या हल्ल्यात इराणची अण्वस्त्र केंद्र आणि लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले आहे. इस्त्रायलने इराणवर अशा वेळी हल्ला केला आहे, ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये न्यूक्लियर डिल होऊ शकली नाही. या हल्ल्यामुळे आता संपूर्ण मिडिल इस्टमध्ये तणाव वाढला आहे. त्याचवेळी अमेरिकेची या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेने या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
इस्त्रायलने केलेल्या हल्ल्याशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले अमेरिकेने म्हटले आहे. परंतु अमेरिकन सीनेटर टॉम कॉटन यांनी उघडपणे इस्त्रायलला पाठिंबा दिला आहे. त्यांनी एक्सवर ट्विट करत लिहिले आहे की, आम्ही इस्त्रायलला साथ देणार आहोत. इराण हा दहशतवादाचा सर्वात मोठा समर्थक देश आहे. त्या देशाकडून हजारो अमेरिकन नागरिकांची हत्या झाली आहे. इराण फक्त अण्वस्त्र शस्त्र बनवत नाही तर अमेरिकेपर्यंत पोहचणारे क्षेपणास्त्रही बनवत आहे. यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इस्त्रायलसोबत असणार आहोत.
इराणच्या अणू शास्त्रज्ञांचा मृत्यू
इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यास ऑपरेशन राइजिंग लायन नाव दिले आहे. त्यासंदर्भात बोलताना इस्त्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले, आमच्या हल्ल्याचे लक्ष्य इराणमधील अण्वस्त्र केंद्र, अण्वस्त्र शास्त्रज्ञ, बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम होते. दरम्यान, या हल्ल्यात इराणच्या दोन अणू शास्त्रांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. शास्त्रज्ञ मोहम्मद मेहदी आणि फेरेयदौन अब्बासी यांचा मृत्यू झाला आहे. तसेच रिवोल्यूशनरी गार्ड्सचे कमांडर होसैन सलामी यांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे इराणसाठी हा मोठा झटका आहे.
इस्त्रायलने का केला हल्ला?
इराणची अण्वस्त्र महत्वकांक्षा अयशस्वी करण्यासाठी इस्त्रायलकडून ऑपरेशन राइजिंग लायनची सुरुवात करण्यात आली. या हल्ल्याबाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी म्हटले की, यापूर्वी इराणद्वारे केलेले हल्ले एकतर्फे होते. आता अमेरिकन सैन्याचे संरक्षण करणे याला आमची प्राथमिकता आहे. इस्त्रायलने आत्मरक्षासाठी इराणवर हा हल्ला केला आहे. या हल्ल्यात आम्ही सहभागी नाही किंवा आमचा काही संबंध नाही.