AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काय अमेरिकेत होणार दहशतवादी हल्ले? इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता स्लीपर सेल सक्रीय करण्याचा इशारा

Israel-Iran War: अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको आहे. परंतु इराणने अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देणार आहोत.

काय अमेरिकेत होणार दहशतवादी हल्ले? इराणने डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता स्लीपर सेल सक्रीय करण्याचा इशारा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 23, 2025 | 11:15 AM
Share

इस्त्रायल आणि इराण युद्धात आता अमेरिकाही आला आहे. इराणविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत अमेरिकेकडून दिले जात आहे. रविवारी अमेरिकेने इराणच्या तीन अणू प्रकल्पांवर हल्ले केले. त्यामुळे आता इराण अमेरिकेत आपली स्लीपर सेल सक्रीय करण्याची शक्यता आहे. यापूर्वी इराणने आमच्या अणू प्रकल्पांवर हल्ले केल्यास अमेरिकेत स्लीपर सेल सक्रीय करणार असल्याचा मेसेज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवला होता, असे वृत्त एनबीसी न्यूजने दिले आहे.

इराणमधील अणू प्रकल्पांवर अमेरिकेने हल्ले केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राला उद्देशून संबोधन केले. त्यावेळी ट्रम्प यांनी म्हटले होते की, इराणचे तीन अणू उर्जा प्रकल्प आम्ही पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी म्हटले की, अमेरिकेला इराणसोबत युद्ध नको आहे. परंतु इराणने अमेरिकन सैन्यावर हल्ला केल्यास आम्ही त्याला चोख प्रत्युत्तर देणार आहोत.

इराणचा प्लॅन काय?

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी अमेरिकेला स्पष्ट संदेश देत म्हटले की, आता चर्चेची वेळ गेली आहे. आम्हाला आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे. अमेरिका युद्धखोर देश आहे. त्यांनी उचललेल्या पावलांचे दूरगामी परिणाम होतील. त्याची सर्व जबाबदारी अमेरिकेवर असणार आहे. अमेरिकेने आमच्या अणू उर्जा प्रकल्पांवर हल्ला करुन सर्व सीमा ओलांडल्या आहेत. रविवारी रात्री जे झाले ते खूप धोकादायक होते. रशियाचे राष्ट्रापती व्लादिमीर पुतिन यांची भेट घेण्यासाठी आपण रशियाला जात आहोत.

रशियाची एन्ट्री होणार का?

अब्बास यांच्या रशिया दौऱ्यामुळे इराण-इस्त्रायल युद्धात रशियाची एन्ट्री होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. रशियाचे माजी राष्ट्रपती आणि सुरक्षा परिषदचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी दावा केला की, जगातील अनेक देश इराणला अण्वस्त्र शस्त्रास्त्र देण्यास तयार आहेत. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, शांततेचा दावा करून सत्तेत आलेले डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला मध्य पूर्वेतील युद्धात ढकलत आहेत.

Follow Us
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....