AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mirabai Chanu: सुवर्णपदक हुकलं पण तरीही वाघिणीने इतिहास रचला, मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम

Mirabai Chanu Asian Games 2026: भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने बुधवारी येथे महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या पदकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली.

Mirabai Chanu: सुवर्णपदक हुकलं पण तरीही वाघिणीने इतिहास रचला, मीराबाई चानूचा ऐतिहासिक पराक्रम
| Updated on: Sep 23, 2026 | 3:47 PM
Share

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने बुधवारी येथे महिलांच्या ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकून आशियाई क्रीडा स्पर्धेतील आपल्या पदकाची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवली. टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूने स्नॅचमध्ये ८८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १११ किलो असे एकूण १९८ किलो वजन उचलले. भारताने २८ वर्षांनंतर वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले आहे. यापूर्वी १९९८ मध्ये कर्णम मल्लेश्वरीने कांस्य पदक जिंकले होते. आता मीराबाई चानूने रौप्य पदक पटकावले आहे.

मीराबाईने यापूर्वी ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत, परंतु आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ही कामगिरी केली नव्हती. मीराबाईने ऑलिम्पिकमधील रौप्य पदक, जागतिक चॅम्पियनशिपमधील सुवर्ण पदक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमधील सुवर्ण पदके आणि आशियाई चॅम्पियनशिपमधील कांस्य पदकासह तीन पदके जिंकली आहेत.

उत्तर कोरियाची दोन वेळची विश्वविजेती री सॉन्ग गमने अपेक्षा पूर्ण करत एकूण २१५ किलो (९४ किलो आणि १२१ किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण केली. तिने स्नॅचमध्ये पहिल्या प्रयत्नात ९० किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात ९४ किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये तिने ११६ किलो आणि १२१ किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तिने दोन्ही टप्प्यांमध्ये तिसरा प्रयत्न केला नाही, त्यामुळे त्याशिवायच सुवर्णपदक मिळवले.

मीराबाईने स्नॅचमध्ये ८३ किलोने सुरुवात केली आणि त्यानंतर पुढील दोन प्रयत्नांत ८५ किलो आणि ८७ किलो वजन उचलून स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात तिसरे स्थान पटकावले. त्यानंतर तिने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्या प्रयत्नात १०७ किलो आणि दुसऱ्या प्रयत्नात १११ किलो वजन उचलून आपले पहिले आशियाई क्रीडा पदक जिंकले. दक्षिण कोरियन खेळाडूच्या तुलनेत तिच्यात १७ किलोचे अंतर असल्यामुळे चानूने तिसरा प्रयत्न केला नाही. आघाडी घेण्यासाठी तिला तिसऱ्या प्रयत्नात किमान १२९ किलोग्रॅम वजन उचलावे लागले असते, जे अशक्य होते. तिने यापूर्वी दोनदा आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता, पण तिला पदक जिंकता आले नव्हते.

Follow Us
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?