AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्त्रायलची एअरस्ट्राइक, या टॉप लिडरचा खात्मा, कोण आहे अल-इस्सा?

अल-इस्सा हा हमासच्या जनरल सिक्युरिटी कौन्सिलचा सदस्य आहे. प्रशिक्षण मुख्यालयाचा प्रमुख आणि अल-कसम ब्रिगेड्सच्या लष्करी अकादमीचा सह-संस्थापक होता. त्याने हजारो अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले.

इस्त्रायलची एअरस्ट्राइक, या टॉप लिडरचा खात्मा, कोण आहे अल-इस्सा?
इस्त्रायलच्या कारवाईत अल-इस्सा ठार
| Updated on: Jun 29, 2025 | 7:39 AM
Share

इराणसोबत शस्त्रसंधी झाल्यानंतर इस्रायलने आपला मोर्चा गाझाकडे वळवला आहे. इस्त्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने गाझामध्ये एअरस्ट्राईक केली. या एअरस्ट्राईकमध्ये इस्त्रायलला मोठे यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. गाझा शहरातील सबरा भागात हवाई हल्ल्यात हमासचा सर्वोच्च लष्करी नेता हकेम मोहम्मद इस्सा अल-इस्सा मारल्याचा दावा केला आहे. अल-इस्साला ७ ऑक्टोबर २०२३ च्या हत्याकांडाचा सूत्रधार आणि हमासच्या लष्करी शाखेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून वर्णन केले आहे.

इस्त्रायल मोहीम सुरुच ठेवणार

आयडीएफने म्हटले आहे की, अल-इस्साने हमासची लष्करी ताकद वाढवण्यात, दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आणि ७ ऑक्टोबरच्या नरसंहराच्या हल्ल्याची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या नरहसंहारात १२०० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच २५० पेक्षा जास्त जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्या घटनेच्या दोन वर्षानंतरही गाझामध्ये हमासने अजूनही ५० जणांना ओलीस ठेवले आहे. त्याने हमासच्या हवाई आणि नौदल हल्ल्यांच्या योजनांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली. ७ ऑक्टोबर २०२३च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना संपवण्यासाठी मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे आयडीएफ आणि इस्रायल सुरक्षा एजन्सीने (आयएसए) म्हटले आहे.

कोण आहे अल इस्सा?

आयडीएफच्या मते, अल-इस्सा हा हमासच्या जनरल सिक्युरिटी कौन्सिलचा सदस्य आहे. प्रशिक्षण मुख्यालयाचा प्रमुख आणि अल-कसम ब्रिगेड्सच्या लष्करी अकादमीचा सह-संस्थापक होता. त्याने हजारो अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले. तसेच हमासची तांत्रिक क्षमता प्रगत करण्याचे काम करत होता. अल इस्सा याने सिरीया आणि इराकमध्ये युद्धाचे प्रशिक्षण घेतले होते. सन २००५ मध्ये तो सिरीयामधून गाझामध्ये आला. त्यानंतर हमास संघटनेचा मुख्य भाग बनला.

गाझामध्ये इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात ५६ हजारांपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत. इस्त्रायलने ७ ऑक्टोंबरच्या नरसंहाराची जबाबदारी घेणाऱ्या दहशतवादी संघटनेतील अतिरेक्यांचा खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. ७ ऑक्टोंबरनंतर इस्त्रायलने हमासच्या अनेक अधिकाऱ्यांचा खात्मा केला आहे. त्यात मोहम्मद सिनवार यांचाही समावेश आहे.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.