AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणशी घमासान सुरु असताना इस्रायलच्या पंतप्रधानांना कॅन्सरचे निदान, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर

इस्रायलच्या पंतप्रधान नेतान्याहू यांनी स्वत:च्या तब्येती संदर्भात मोठा खुलासा केला आहे. एकीकडे इराणशी युद्ध सुरु असताना नेतान्याहू यांनी आपण कॅन्सरलाही सामोरे जावे लागल्याचे म्हटले आहे.

इराणशी घमासान सुरु असताना इस्रायलच्या पंतप्रधानांना कॅन्सरचे निदान, तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर
Benjamin Netanyahu
| Updated on: Apr 24, 2026 | 10:13 PM
Share

इराण आणि अमेरिका- इस्रायल असे युद्ध सुरु असतानाच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना कॅन्सरचे निदान झाले आहे. ही माहिती स्वत: पंतप्रधान नेतान्याहू यांनी सोशल मीडियाद्वारे स्वत: ही माहिती दिली. नेतान्याहू यांनी सांगितले की २०२४ मध्ये त्यांच्या एका तपासणी दरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. डॉक्टरांनी यावर यशस्वी उपचार केले आहेत. आता स्थिती पहिल्यापेक्षा बरी आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नेतान्याहू यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता.

पंतप्रधान नेतान्याहू यांनी पोस्ट लिहून सांगितले की मी आता संपूर्णपणे नीट आहे.डॉक्टरांनी एक सेंटीमीटरचा एक छोटासा ट्युमर सर्जरी करुन हटवला आहे. आता पर्यंत मी याबाबत काही लिहिले नव्हते कारण, इराण यावर फेक न्यूज पसरवू शकला असता.

सीएनएनच्या मते डिसेंबर २०२४ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर प्रोस्टेट संबंधित सर्जरी झाली होती.मात्र, त्यावेळी हे कळले नव्हते की ही कॅन्सरची सर्जरी आहे.

पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी पुढे काय लिहिले ?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पोस्ट मध्ये पुढे लिहीले की मी कॅन्सरला देखील हरवले आहे. दीड वर्षांपूर्वी मला याची माहिती मिळाली होती. तेव्हा मी उपचार करायचा विचार केला होता. काही महिन्यांपूर्वी एक रिपोर्ट येणे बाकी होते. ज्याला मी टाळले होते. आज रिपोर्ट आला आहे आणि मी पूर्णपणे बरा झालो आहे.

नेतान्याहू यांनी पोस्ट मध्ये लिहिले की मी कॅन्सरला देखील हरवले आहे. माझी ही पद्धत आहे की मला जेव्हापासून एखाद्या समस्ये संदर्भात कळते, तेव्हा मी त्यावर उपाय शोधण्यासाठी मागे लागतो.

नेतान्याहू यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर कॅन्सरचे उपचार जेरुसेलम येथील हदासा रुग्णालयात करण्यात आले.

19 वर्षांपासून पंतप्रधान पदावर नेतान्याहू

1996 मध्ये पहिल्यांदा नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. १९९९ पर्यंत ते या पदावर राहिले. त्यानंतर २००९मध्ये ते दुसऱ्यांदा ते इस्रायलचे पंतप्रधान झाले. या कार्यकाळात ते २०२१ पर्यंत पंतप्रधान राहिले. २०२२ मध्ये नेतान्याहू पुन्हा इस्रायलचे पंतप्रधान म्हणून निवडून आले. तेव्हापासून आतापर्यंत नेतान्याहू इस्रायलचे पंतप्रधान आहेत.

नेतान्याहू यांच्या काळात इस्रायलने गाझात हमास, लेबनॉनमध्ये हेजबोल्लाह सारख्या संघटनांना कमजोर केले आहे. नेतान्याहू यांची योजना इस्रायलला मध्य पूर्वेत ग्रेटर इस्रायल बनवण्याची आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल