AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ismail Haniyeh Killed : ‘जगातून घाण साफ करण्याची हीच…’, हमास चीफच्या खात्म्यावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया

Ismail Haniyeh Killed : इस्रायलने आज स्पेशल ऑपरेशन केलं. त्यात त्यांनी इराणची राजधानी तेहरानमध्ये घुसून आपला सर्वात मोठा शत्रू इस्माइल हानियाला मारलं. या कारवाईनंतर इस्रायलमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अजून इस्रायलने अधिकृत वक्तव्य केलेलं नाही.

Ismail Haniyeh Killed : 'जगातून घाण साफ करण्याची हीच...', हमास चीफच्या खात्म्यावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया
hamas chief ismail haniyeh
| Updated on: Jul 31, 2024 | 12:38 PM
Share

इस्रायलने आज सकाळी त्यांचा मोठा शत्रू, हमासचा प्रमुख इस्माइल हानियाला संपवलं. हानियाला मारण्यासाठी इस्त्रायलने इराणची राजधानी तेहरानची निवड केली. एकदिवस आधीच हानिया इराणच्या नव्या राष्ट्रपतींच्या शपथग्रहण सोहळ्यात दिसला होता. दुसऱ्याचदिवशी इस्रायलने त्याला संपवलं. हानियाच्या मृत्यूकडे इस्रायलचा मोठा विजय या दृष्टीने पाहिलं जातय. इस्रायलने अजूनपर्यंत हल्ला आपणच केल्याच कबूल केलेलं नाही. हानियाच्या मृत्यूनंतर इस्रायलमध्ये मंत्र्यांसह सर्वसामान्यांनी सेलिब्रेशन सुरु केलय. इस्रायलचे मंत्री अमीचाय एलियाहू पहिले व्यक्ती आहेत, ज्यांनी अधिकृतपणे इस्माइल हानियाच्या मृत्यूवर प्रतिक्रिया दिली आहे.

‘जगातील ही घाण साफ करण्याची हीच योग्य पद्धत आहे’ असं अमीचाय एलियाहू यांनी म्हटलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हानियाच्या मृत्यूबद्दल काहीही बोलण्यास मंत्र्यांना मनाई केल्याच इस्रायलच्या स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे, तरीही अमीचाय एलियाहू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हमास प्रमुख इस्माइल हानिया मंगळवारी इराणचे नवीन राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्या शपथ ग्रहण समारंभात सहभागी झाला होता. या दरम्यान त्याने इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांची भेट घेतली.

हानियाला कसं मारलं?

त्यानंतर दुसऱ्यादिवशी सकाळी म्हणजे आज बुधवारी इस्रायलने इस्माइल हानियाच तेहरानमधील घरच उडवून दिलं. इस्रायलने 24 तासांच्या आत दोन ऑपरेशन्स केली. इस्रायलने काल लेबनानची राजधानी बेरुतवर एअर स्ट्राइक केला. त्यात हिजबुल्लाहचा कमांडर फउद शुकर ठार झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. गोलान हाइट्सवरील हल्ल्याचा बदला म्हणून इस्रायलकडून ही कारवाई करण्यात आली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.