AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणमध्ये जाऊन इस्रायलची गुप्त कारवाई, लष्करी अधिकाऱ्यांना केले ठार

लेबनॉनमधील पेजर स्फोटात इराणचे राजदूत मोजतबा अमानी हे देखील जखमी झाले होते. त्यानंतर बेरूतमधील इराणच्या दूतावासात देखील पेजरचा स्फोट झाला होता. इराणने त्या हल्ल्यांसाठी इस्रायलला दोषी ठरवले होते. त्यानंतर ही इराणने बदला घेण्याची शपथ घेतली होती. पण त्यानंतर ही इस्रायलने इराणमध्ये जाऊन कारवाई केली आहे.

इराणमध्ये जाऊन इस्रायलची गुप्त कारवाई, लष्करी अधिकाऱ्यांना केले ठार
| Updated on: Sep 27, 2024 | 8:20 PM
Share

इस्रायलकडून गेल्या काही दिवसांपासून कारवाया सुरु आहे. हमास आणि हिजबुल्लाहवर इस्रायल तुटून पडला आहे. इस्रायलकडून सतत हल्ले केले जात आहे. आता अलीकडच्या काही दिवसांत लेबनॉन आणि गाझामध्ये त्यांच्याकडून सातत्याने कारवाया सुरु आहेत. या कारवायांमध्ये इस्रायलने हिजबुल्लाह आणि हमासच्या अनेक कमांडरांना ठार केलंय. लेबनॉनमध्ये एकापाठोपाठ एक हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत. या दरम्यान इस्रायलने इराणला देखील दुखावले आहे. हमासच्या प्रमुखाला इस्रायलने इराणमध्ये ठार केल्याने इराणने देखील इस्रायलविरोधात कारवाईचा इशारा दिला आहे. दुसरीकडे इस्रायलने गुप्त कारवाई करत IRGC सदस्यांना ठार मारले आहे. इतकंच नाही तर त्याने काही महत्त्वाची कागदपत्रे देखील मिळवले आहेत. आता इस्रायलला कसं प्रत्युत्तर द्यायचं हे इराणला देखील कळत नाहीये.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, इराणमधील एक गट आपल्या सरकारवर खूश नाही. कारण इस्त्रायल लेबनॉनमध्ये इराणचा जवळचा मित्र असलेल्या हिजबुल्लाला लक्ष्य करत आहे. असे असूनही इराण शांत आहे. इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांनीही संयुक्त राष्ट्रात सांगितले की त्यांच्या देशाला सर्वांसाठी शांतता हवी आहे आणि कोणाशीही संघर्ष करण्याचा त्यांचा हेतू नाही.

इराण सरकार आपल्या प्रमुख सहयोगी हमास आणि हिजबुल्लाह यांच्या विरुद्ध इस्रायलच्या कारवाईवर देखील शांत आहे. पेजर स्फोटात इराणचे राजदूत देखील जखमी झाले होते त्यानंतर ही इराण शांत आहे. असं येथील लोकांचे म्हणणे आहे. पण इराण सध्या संयमाच्या भूमिकेत आहे. या वर्षी एप्रिलमध्ये इस्रायलने दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर हल्ला केला तेव्हा इराणने इस्त्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले. तेहरानमध्ये हमासचे नेते इस्माईल हनीयेह यांच्या हत्येनंतर इराणनेही इस्रायलचा बदला घेण्याची शपथ घेतली होती.

गेल्या आठवड्यात, इराणी इंटरनेट टीव्ही कार्यक्रम मायदानच्या होस्टने, इराणी गुप्तचर स्त्रोतांचा हवाला देऊन दावा केला होता की इस्रायलने गेल्या महिन्यात एक विशेष ऑपरेशन केले ज्यामध्ये IRGC सदस्य मारले गेले आणि कागदपत्रे चोरीला गेली. इराणच्या आत घडलेल्या घटनेचे वार्तांकन करण्यापासून इराणी प्रेसला मनाई करण्यात आली होती, असा त्यांचा दावा होता.

पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?जमीन गैरव्यवहार प्रकरणी हायकोर्टाचा सवाल.
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा
सोमय्या भाजपवर नाराज...2019चा अपमान विसरलो नाही, बड्या नेत्यावर निशाणा.
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी
निधीवरून महायुतीतच चकमक, विधान परिषदेत भाजपची अजितदादांवर नाराजी.
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....