
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. आता या ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला किती मोठे नुकसान झाले हे पुढे आले. भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे अख्ये खानदान मारले गेले. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने सुरक्षा यंत्रणांसमोर धक्कादायक कबुली दिली आहे. त्याने मान्य केले आहे की, 7 मे 2025 मध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे पूर्ण कुटुंब मारले गेले.
आता हा धक्कादायक आणि खळबळ उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हेच नाही तर यासोबतच काही कबुलनामे देताना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने मान्य केले की, बहावलपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात मसूद अजझरच्या घरातील सदस्यांचे जीव गेले. मसूद इलियास कश्मीरी व्हिडीओमध्ये स्पष्टपणे म्हणत आहे की, भारतीय लष्कराने 7 मे 2025 ला बहालपूर येथील दहशतवादी अड्ड्यावर हमला केला.
त्यावेळी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब त्याचठिकाणी होते. आम्ही दहशतवादाला गळ्याला लावले. आम्ही या देशाच्या सीमेच्या रक्षेसाठी दिल्ली, काबुल आणि कंधारची लडाई लढली. सर्वकाही बलिदान केले. 7 मे ला मसूद अझदरच्या कुटुंबाला भारतीय लष्कराने संपवले. हेच नाही तर व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कश्मीरी हा बोलत आहे त्यावेळी त्याच्यामागे अनेक लोक बंदूक घेऊन उभी आहेत. भारताने पहलगाम हल्ल्लाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता.
🚨 #Exclusive 🇵🇰👺
Jaish-e-Mohamad top commander Masood ilyas kashmiri admits that On 7th May his leader Masood Azhar's family was torn into pieces in Bahawalpur attack by Indian forces.
Look at the number of gun-wielding security personnel in the background. According to ISPR… pic.twitter.com/OLls70lpFy
— OsintTV 📺 (@OsintTV) September 16, 2025
पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांवर गोळ्या झाल्या. या हल्ल्याचे धक्कादायक अशी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात चिड दिसली. भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबून मसूद अझहरचे कंबरडे मोडून पूर्ण खानदानाला मारले आहे. आता जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरनेच तश कबूली देखील दिली. आता हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला असून पाकिस्तानातीलच हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जातोय.