ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने एकाच वेळी तीन शूत्रूंना हरवले, काय म्हणाले उप लष्कर प्रमुख ?
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने पाकिस्तान सोबत चीनशी दोन हात केले आहे. लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी या मोहिमेतील वायू दलाची भूमिका कशी महत्वाची होती हे एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. भविष्यात आणखीन तयारीची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले. पाकिस्तानचे चीनवर अवलंबित्व आणि चीनकडून त्यांना सैन्याची माहीती पुरवणे चिंताजनक असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी खूपच महत्वाचे होते. या दरम्यान भारत केवळ पाकिस्तानशी लढत नव्हता तर पडद्यामागून चीन देखील पाकिस्तानला मदत करत होता. या संदर्भात उप लष्कर प्रमुख लेफ्टनंट राहुल आर. सिंह यांचे मोठं वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की संपूर्ण मोहिमेत एअर डिफेन्स आणि त्याचे ऑपरेशन महत्वाचे होते. यावेळी आमच्या लोकसंख्या केंद्रांवर आवश्यक लक्ष दिले गेले नाही. परंतू पुढच्यावेळी आपल्याला तयार राहावे लागेल. आमच्या जवळ एक सीमा होती आणि विरोधक दोन होते.वास्तविक तीन होते. पाकिस्तान मुख्य मोर्चावर होत तर चीन शक्यता आहे की सर्वच सहकार्य देत होता.
फिक्कीने आयोजित केलेल्या ‘न्यू एज मिलिट्री टेक्नोलॉजीज’या विषयावरील कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले की पाकिस्तानच्या जवळील ८१ टक्के सैन्य हार्डवेअर चीनचे आहे.चीन त्याच्याजवळील शस्रास्रांची चाचणी अन्य शस्रास्रांच्या विरुद्ध करण्यास सक्षम आहे., त्यामुळे हे त्यांच्यासाठी लाईव्ह लॅबोरेटरी सारखे होते. तुर्कीने पण या प्रकारचे सहाय्य प्रदान करण्यास महत्वाची भूमिका निभावली. जेव्हा डीजीएमओ स्तरावरील चर्चा चालू होती. तेव्हा पाकिस्तानला चीनकडून आपल्या महत्वपूर्ण वेक्टर्स बद्दल लाईव्ह अपडेट मिळत होते. आपल्याला एका मजबूत एअर डिफेन्सची आवश्यकता आहे.’
ऑपरेशन सिंदूरने काही धडे दिले – भारतीय सेना
ते पुढे म्हणाले की एक पंत तयार होता. पाकिस्तानला समजले की जर तो लपवलेला पंच कामास आला तर त्यांची हालत खूप खराब होईल. त्यामुळेच त्यांनी सीजफायरची मागणी केली. यावेळी लेफ्टनंट जनरल राहुल आर.सिंह यांनी अतिरेक्यांच्या अड्ड्यांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय सैन्याचे कौतूक केले. त्यांनी टार्गेट निवड, योजनेत धोरणात्मक संदेश आणि टेक्नॉलॉजी आणि ह्युमन इंटेलिजन्सच्या इंटेग्रेशनवर जोर दिला.
एकूण २१ टार्गेटचा अभ्यास केला होता, पण…
ते म्हणाले की,’ ऑपरेशन सिंदूरपासून काही धडे मिळाले आहेत. नेतृत्वाकडून धोरणात्मक संदेश स्पष्ट होता. काही वर्षांपूर्वीसारखा दुख सहन करण्याचे कोणतीही गरज नाही. टार्गेटची प्लानिंग आणि निवड खूप साऱ्या डेटाद्वारे केली होती. टेक्नॉलॉजी आणि ह्युमन इंटेलिजन्सचा वापर करण्यात आला. यासाठी एकूण २१ टार्गेटची ओळख पटवण्यात आली. त्यातील ९ टार्गेटवर हल्ला करणे हे समजदारी ठरेल. केवळ अंतिम दिवस वा अंतिम तास होता जेव्हा ठरवले गेले याच ९ टार्गेटवर हल्ला करायचा.’
भारताने 6-7 मेच्या रात्री टार्गेटवर हल्ला केला
पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर आरंभले होते. भारतीय सैन्याने ६-७ मे च्या रात्री पाकिस्तान आणि पीओकेत अतिरेकी अड्डे नष्ट केले होते. या कारवाईनंतर पाकिस्तान चिडला आणि त्याने भारतावर हल्ले केले. पाकिस्तानने मिसाईल आणि ड्रोनने हल्ले केले. ज्याचा भारताने जोरदार प्रतिकार केला. भारतीय सैन्याने हवेतच पाकिस्तानी मिसाईल आणि ड्रोन पाडून टाकले.
