भारतीय सैन्याचं ड्रोन दिसताच…पाकिस्तानकडून चिथावणीखोर हरकत

पाकिस्तानी सैन्याच्या या हरकतीमुळे तणाव वाढू शकतो. मागच्यावर्षी दोन्ही देशांमध्ये हिंसक संघर्ष पहायला मिळाला होता. पहलगामच्या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे.

भारतीय सैन्याचं ड्रोन दिसताच...पाकिस्तानकडून चिथावणीखोर हरकत
Drone
Image Credit source: Representative Image
| Updated on: Apr 01, 2026 | 1:31 PM

जम्मूच्या आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात पाकिस्तानने भारतीय Remotely Piloted Aircraft (RPA) फायरिंग केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. यात कुठलही नुकसान झालं नसल्याचं वृत्त आहे. रिपोर्टनुसार, काल रात्री कनाचक सेक्टरमधील पाकिस्तान पोस्टवरुन तब्बल पाच राऊंड फायर करण्यात आले. यात चार राऊंड पाकिस्तानी पोस्ट खेरी आणि एक राऊंड अस्लम पोस्टवरुन फायर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय RPA आपल्या क्षेत्रातूनच नियमित टेहळणीचं काम करत होतं. त्याचवेळी पाकिस्तानकडून फायरिंग करण्यात आली. या घटनेत भारतीय ड्रोनचं काहीही नुकसान झालेलं नाही. ते सुरक्षितपणे परत आलय. सीमेवर याआधी पाकिस्तानकडून वारंवार युद्धविराम मोडण्याच्या घटना घडल्या आहेत. भारतीय सैन्याने लगेच त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. त्यात आता ही बातमी समोर आली आहे.

पाकिस्तानी सैन्याच्या या हरकतीमुळे तणाव वाढू शकतो. मागच्यावर्षी दोन्ही देशांमध्ये हिंसक संघर्ष पहायला मिळाला होता. पहलगामच्या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. एक छोटीसी चिथावणीची घटना मोठ्या संघर्षामध्ये बदलू शकते. पाकिस्तानची ही कृती बेजबाबदारपणाची आणि चिथावणी देणारी आहे.

भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर

भारतीय सीमेजवळ पाकिस्तानी सैन्याच्या हालचाली सुरु असतात. अनेकदा समोरच्या बाजूने सीजफायरचं उल्लंघन होतं. अलीकडेच LOC जवळ पाकिस्तानी ड्रोन्स आणि फुगे दिसले होते. त्याशिवाय पाकिस्तानकडून सतत POK मधील दहशतवाद्यांना मदत पोहोचवली जात आहे. जे वारंवार भारतावर हल्ला करण्याच्या शपथा घेत असतात. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. शोध अभियान सुरु आहे.

ऑपरेशन सिंदूर

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर लॉन्च करुन बदला घेतला होता. पाकिस्तान आणि POK मधील नऊ दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. चार दिवस हा संघर्ष चाललेला. भारतीय सैन्य दलांनी यशस्वीरित्या पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला परतवून लावलेला. पाकिस्तानने भारतीय नौदलाविरोधात मिशन सी सुल्तान लॉन्च केलं आहे. त्यासाठी पाकिस्तानी नौदलाने लॉन्ग रेंज मेरीटाइम पेट्रोल एअरक्राफ्टचा (LRMP) आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.

Follow Us