IND vs NZ : पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप, त्याआधी टीम इंडियाच्या निवडीत इतका गोंधळ, अश्विन सरळ बोलला हा तर अन्याय
IND vs NZ : न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरीजसाठी आणि टेस्ट मालिकेसाठी काल टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप आहे. त्याआधी दोन महत्वाच्या खेळाडूंना टीममधून डच्चू देण्यात आला आहे, हे खरच न समजण्यासारखं आहे.

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या निवड समितीने न्यूझीलंड दौऱ्यासाठी पाच वनडे आणि टेस्ट सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. न्यूझीलंड विरुद्ध पाच टी20 सामन्यांची मालिका संपल्यानंतर 4 नोव्हेंबरपासून पाच वनडे मॅच आणि 19 नोव्हेंबरवासून दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या दोन्ही सीरीजसाठी काल बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीने स्क्वाडची घोषणा केली. न्यूझीलंड दौऱ्यासाठी निवडलेल्या वनडे टीममुळे अनेकांना धक्का बसला आहे. पुढच्यावर्षी वनडे वर्ल्ड कप आहे. त्या दृष्टीने काही खेळाडूंना वगळणं हे धक्कादायक आहे. टीम इंडियाच्या सिलेक्शनशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घ्या.
एका वनडे सीरीजसाठी दोन वेगवेगळ्या टीम निवडण्यात आल्या आहेत. एका स्क्वॉड सुरुवातीच्या तीन सामन्यांसाठी तर दुसरा स्क्वॉड शेवटच्या दोन वनडेसाठी असेल.
पहिल्या तीन सामन्यात शुबमन गिल कॅप्टन असेल. शेवटच्या दोन वनडेमध्ये श्रेयस अय्यर कॅप्टन असेल. या दोन मॅचमध्ये इशान किशन उपकर्णधार असेल.
2 वनडे मॅचसाठी 21 वर्षाचा झारखंडचा युवा विकेटकिपर फलंदाज कुमार कुशाग्रला निवडण्यात आलं आहे. टीम इंडियात त्याला पहिल्यांदा संधी मिळाली आहे.
वनडे टीमचा ओपनर यशस्वी जैस्वाल आणि दिग्गज ऑलराऊंडर रवींद्र जाडेजाला वगळण्यात आलं आहे. हे दोघेही वेस्ट इंडिज विरूद्धच्या वनडे सीरीजमध्ये होते. वनडे टीममधून त्यांना वगळणं हे धक्कादायक आहे. यशस्वी जैस्वालला वनडे सीरीजमध्ये संधी न देणं हे अन्यायकारक आणि दुर्देवी आहे असं अश्विनने म्हटलं आहे.
मागच्या वनडे सीरीजमध्ये डेब्यू करणाऱ्या अंशुल कम्बोज आणि आकिब नबीला सुद्धा संधी मिळाली आहे. कम्बोजला 3 मॅचसाठी आणि नबीला शेवटच्या दोन मॅचसाठी संधी मिळाली आहे.
जसप्रीत बुमराहला संपूर्ण वनडे सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. तो फक्त दोन कसोटी सामने खेळेल.
दुखापतीशी सामना करणारा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वनडे आणि टेस्ट स्क्वॉड मध्ये संधी देण्यात आली आहे. दुखापतग्रस्त ऋषभ पंतला कसोटी संघात स्थान मिळालय. दोघांना फिटनेस सिद्ध करावा लागेल.
टी20 उपकर्णधार तिलक वर्माने वनडे टीममध्ये पुनरागमन केलय. त्याला शेवटच्या दोन मॅचसाठी संधी मिळाली आहे.
वर्षभरानंतर वेगवान गोलंदाज आकाश दीपने टेस्ट टीममध्ये कमबॅक केलय. इंग्लंडमध्ये डेब्यू करणाऱ्या अंशुल कम्बोजने टेस्ट टीममध्ये पुनरागमन केलय.
