किम जोंग उन यांनी वाढवलं ट्रम्प यांचं टेन्शन, उत्तर कोरियातून आलेल्या बातमीनं अमेरिकेत खळबळ
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेचं टेन्शन वाढवलं आहे, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना आता थेट अमेरिका आपल्या मिसाईलच्या टप्प्यामध्ये आणायची आहे, त्यासाठी खास मिसाईल तयार करण्यात येत आहे.

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेचं टेन्शन वाढवलं आहे, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांना आता थेट अमेरिका आपल्या मिसाईलच्या टप्प्यामध्ये आणायची आहे. एका मिडिया रिपोर्टनुसार किम जोंग उन सध्या अशी इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल तयार करत आहे, जी थेट अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते, अमेरिकेवर थेट हल्ला करणं सोपं व्हाव या उद्देशानं ही मिसाईल तयार केली जात आहे, उत्तर कोरिया या मिसाईल निर्मितीच्या आता अंतिम टप्प्यात आहे.
उत्तर कोरियातून आलेल्या या बातमीमुळे व्हाईट हाऊस आणि ट्रम्प प्रशासनाची झोप उडाली आहे. याबाबत बोलताना दक्षिण कोरियाचे मंत्री चुंग डोंग यंग यांनी मोठा खुलासा केला आहे. उत्तर कोरियामध्ये समृद्ध युरेनियम तयार करण्याचा कार्यक्रम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यांच्याकडे आतापर्यंत 2,000 किलोग्रॅमपर्यंत समृद्ध युरेनियम तयार झाले आहे, ज्याच्या मदतीने अनेक अण्वस्त्रे तयार होऊ शकतात, असा दावा दक्षिण कोरियाच्या मंत्र्यांनी केला आहे.
गेल्या वर्षी उत्तर कोरियानं ह्वासोंग 19 नावाच्या आयसीबीएमची चाचणी केली होती, त्यावेळी असा दावा करण्यात आला होता की, ही मिसाईल पृथ्वीच्या वातावरणाबाहेर पोहोचली होती. त्यामुळे आता असं मानलं जातं आहे की, उत्तर कोरिया तयार करत असलेली ही खास मिसाईल अमेरिकेच्या कुठल्याही भागाला लक्ष करण्यासाठी सक्षम असणार आहे. उत्तर कोरिया हे मिसाईल बनवण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे.
दरम्यान दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपतींनी देखील एक मोठा खुलासा केला आहे, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे-म्युंग यांनी केलेल्या दाव्यानुसार किम जोंग उन यांनी असं म्हटलं आहे की, ते फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच चर्चा करतील आणि ते पण अमेरिकेनं अण्वस्त्र निःशस्त्रीकरणाची मागणी सोडून द्यावी तर आणि तरच चर्चा होऊ शकते, यावरून हेच स्पष्ट होत आहे की, उत्तर कोरिया हो केणत्याही परिस्थितीमध्ये अण्वस्त्र निःशस्त्रीकरणासाठी तयार नाहीये, हा अमेरिकेसाठी मोठा झटका मानण्यात येत आहे.
