AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ देशात 26,000 विवाहीत महिलांची नागरिकता काढून घेतली, अकाउंट केलं फ्रीज, कारण वाचा

कुवेतमध्ये गेल्या 6 महिन्यांत 42 हजार नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो आता कुवेतमध्ये अनोळखी आहे आणि त्याचे बँक खाते गोठवले गेले आहे.

‘या’ देशात 26,000 विवाहीत महिलांची नागरिकता काढून घेतली, अकाउंट केलं फ्रीज, कारण वाचा
कुवेतमध्ये 26,000 विवाहीत महिलांची नागरिकता काढली
| Edited By: | Updated on: May 26, 2025 | 2:28 PM
Share

कुवेतमध्ये गेल्या काही महिन्यांत सुमारे 42 हजार नागरिकांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले आहे. डिसेंबर 2023 मध्ये सत्तेवर आलेले 84 वर्षीय नवीन अमीर मिशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू झाली. कुवेतमध्ये राहणाऱ्या सुमारे 50 लाख लोकांपैकी केवळ एक तृतीयांशच खरे कुवैती आहेत, असे अमीरने एका भाषणात सांगितले. ऑगस्टपासून हजारो लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले असून, त्यात लग्नानंतर नागरिकत्व घेतलेल्या 26 हजार महिलांचा समावेश आहे.

सरकारचं म्हणणं आहे की, आता कुवेतमध्ये फक्त खरे कुवैतीच राहतील, ज्यांचे रक्ताचे नाते इथले आहे. हे धोरण बेकायदेशीरपणे कुवेतचे नागरिकत्व मिळविणाऱ्या परदेशी नागरिकांना लक्ष्य करते.

कुवैती बायकांना सर्वाधिक फटका

कुवैती पुरुषांशी लग्न करून येथील नागरिक बनलेल्या महिलांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या या कारवाईचे मुख्य लक्ष्य बनली आहे. नागरिकत्व काढून घेतल्यानंतर हे लोक कोणत्याही देशाचे नागरिक राहत नाहीत. सरकारी आरोग्य सेवा, मुलांची शाळेची फी, जमीन खरेदी किंवा कंपन्यांमध्ये हिस्सा अशा अधिकारांपासून ते वंचित आहेत. काहींचे ड्रायव्हिंग लायसन्स रद्द करण्यात आले आणि बँक खात्यांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला. असाच प्रकार या महिलांच्या बाबतीत घडला, जेव्हा त्यांनी पैसे भरण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची खाती गोठवण्यात आली.

अमीरची कडक भूमिका

कुवेतमध्ये राहणाऱ्या सुमारे 50 लाख लोकांपैकी केवळ एक तृतीयांशच खरे कुवैती आहेत, असे अमीरने एका भाषणात सांगितले. ऑगस्टपासून हजारो लोकांचे नागरिकत्व रद्द करण्यात आले असून, त्यात लग्नानंतर नागरिकत्व घेतलेल्या 26 हजार महिलांचा समावेश आहे.

हा कुवैतचा अधिकृत अहवाल आहे, तर वास्तविक आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. नवे अमीर शेख मेशाल अल अहमद अल सबाह यांनी डिसेंबर 2023 मध्ये अमीर झाल्यानंतरच संसद बरखास्त केली आणि घटनेतील काही भाग निलंबित केले.

नागरिकत्व कायद्यात सुधारणा

डिसेंबरमध्ये एका कायद्यात सुधारणा करून ‘नैतिक पतन, बेईमानी किंवा श्रीमंत आणि धार्मिक व्यक्तींवर टीका’ या सारख्या कारणांमुळे नागरिकत्व रद्द करण्याची परवानगी देण्यात आली. त्याअंतर्गत गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च समिती कोणाचे नागरिकत्व वैध आहे याचा निर्णय घेत आहे.

दर आठवड्याला ज्यांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले आहे, त्यांची नावे जाहीर केली जातात. लोक भीतीपोटी या यादीत स्वत:ची किंवा नातेवाईकांची नावे शोधतात. कुवेतमध्ये दुहेरी नागरिकत्वाची परवानगी नाही, त्यामुळे कुवैतचे नागरिकत्व घेणाऱ्यांना आपले मूळ नागरिकत्व सोडावे लागते.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.