AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: रशियाने हल्ले वाढवले, युक्रेनमध्ये आक्रोश आणि आगडोंब; हे घ्या 10 पुरावे

रशिया-युक्रेन युद्धाचा आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत 13 बालकांसह कमीत कमी 136 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

VIDEO: रशियाने हल्ले वाढवले, युक्रेनमध्ये आक्रोश आणि आगडोंब; हे घ्या 10 पुरावे
रशियाने हल्ले वाढवले, युक्रेनमध्ये आक्रोश आणि आगडोंबImage Credit source: AFP PHOTO
| Updated on: Mar 02, 2022 | 1:12 PM
Share

क्यीव: रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) आज सातवा दिवस आहे. चर्चेच्या फैरीनंतरही युक्रेनवरील  (Ukraine) हल्ले थांबलेले नाहीत. उलट आज सातव्या दिवशी रशियाने (Russia) युक्रेनवरील हल्ले वाढवले आहेत. रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमध्ये आतापर्यंत 13 बालकांसह कमीत कमी 136 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सैनिकांचाही मृत्यू झाला असून शेकडो सैनिक जखमी झाले आहे. रशियातील हल्ल्यात घरे आणि इमारती उद्ध्वस्त झाल्या असून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे. लोक जीव वाचवण्यासाठी बंकर्समध्ये आणि रेल्वे स्थानकांवर राहत आहेत. आज सातव्या दिवशी तर खारक्यीव आणि सूमीमध्ये जोरदार हल्ले चढवण्यात आले आहेत. बॉम्ब हल्ले, मिसाईल अटॅक्स आणि अंधाधुंद गोळीबार यामुळे युक्रेनच्या अनेक शहरात आगडोंब उसळला असून नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला आहे. युक्रेनवरील हल्ल्याची ही दाहकता व्हिडीओतूनही पाहता येणार आहे.

रशियाने युक्रेनच्या खेरसनमध्ये आज जोरदार हल्ले केले. त्यामुळे अनेक इमारती आणि घरे पेटली असून धुराचे लोट संपूर्ण आकाशभर पसरले आहेत. जोरदार धमाक्यांच्या आवाजाने स्थानिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

खारकीवमधील मेडिकल सेंटरवर जोरदार हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे खारकीवचं मेडिकल सेंटर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. हे मेडिकल सेंटर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं असून या परिसरात चिटपाखरूही फिरताना दिसत नाहीये.

युक्रेनवरील हल्ल्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य लोकांना बसला आहे. गेल्या सात दिवसांपासून युद्ध सुरू आहे. हे युद्ध कधी संपेल याची काहीच शाश्वती नसल्याने युक्रेनमधून अनेक लोक बाहेरच्या देशात आश्रयाला जात आहेत. आतापर्यंत सात लाख लोकांनी युक्रेन सोडल्याचं सांगण्यात येत आहे. आजूबाजूच्या पोलंडसारख्या देशात हे लोक आश्रय घेत असून बॉर्डरवर नागरिकांचे जत्थेच्या जत्थे दिसत आहेत.

रशियाने सर्वाधिक टार्गेट क्यीव शहराला केलं आहे. क्यीव शहर ही रशियाची राजधानी आहे. त्यामुळे रशियाने क्यीववर मिसाईलचा जोरदार मारा करत आहेत. त्यामुळे क्यीवमध्ये वारंवार सायरन वाजवून नागरिकांना अलर्ट केलं जात आहे. त्यांना घराबाहेर न पडण्याचं आणि बंकर्सचा आश्रय घेण्यास सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे सायरनचा आवाज ऐकताच नागरिकांच्या काळजात धस्स होत असून भीतीने त्यांची गाळण उडाली आहे.

खारक्यीवमध्ये रशियन सैन्याकडून रात्रभर गोळीबार करण्यात आला. पॅराशूटने रशियन सैन्य खारक्यीवमध्ये उतरलं आणि या सैन्याने स्थानिक नागरिकांवर अंधाधूंद गोळीबार करण्यात आला. रात्रभर गोळ्यांचा आवाज आणि बॉम्ब हल्ल्यांमुळे हे शहर उद्ध्वस्त झालं आहे.

युक्रेनमधील थर्मल पॉवर प्लांटवरही गोळीबार करण्यात आला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. या प्लांटला आग लागल्यास मोठा अनर्थ ओढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं बोरोद्यांका हे शहरच उद्ध्वस्त झालं आहे. शहरातील इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत. अनेक इमारती आगींनी धगधगत आहेत. तसेच 300 रशियन टँक युक्रेनमध्ये घुसवण्याचा रशियाचा डाव असून सीमेवर हे सर्व टँक आणल्याचं सांगितलं जात आहे.

300 रशियन टँकर्स युक्रेनमध्ये घुसण्याच्या तयारीत आहेत. रशियन टँक युक्रेनच्या बॉर्डरपासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहेत. त्यामुळे रशियाकडून आज युक्रेनमध्ये आजवरचा सर्वात मोठा हल्ला केला जाणार असल्याचं चित्रं आहे. अत्यंत घातक असे हे टँक आहेत. त्यामुळे युक्रेन नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

झायटोमीर शहरातही आज सकाळी रॉकेट हल्ला करण्यात आला. रशियाने झायटोमीर शहरातील इमारती आणि रहिवाशी भागाला टार्गेट केलं आहे. त्यामुळे या शहरातही सर्वत्र आगीचे तांडव आणि धुराचे लोट दिसत आहेत.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Live : खारकीव मेडीकल सेंटरवर एअरस्ट्राईक

Russia Ukraine War Photo: युद्धाच्या खाईतून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मोदी सरकार काय करतंय? पहा ही फोटो स्टोरी

Photo : कीवनंतर रशियाचे खार्किवर हल्ले, हल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; प्रचंड प्रमाणात वित्तहानी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.