AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प, खळबळ उडवणारी माहिती, हॉटेलमधील पार्टीवेळी काही क्षणातच हल्लेखोर..

जगाची झोप उडवणारी बातमी अमेरिकेतून आली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी पोहोचले होते. तिथे मोठा गोळीबार झाला. यादरम्यानचे काही व्हिडीओ देखील पुढे आले. थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प वाचल्याचे बघायला मिळत आहे.

थोडक्यात बचावले डोनाल्ड ट्रम्प, खळबळ उडवणारी माहिती, हॉटेलमधील पार्टीवेळी काही क्षणातच हल्लेखोर..
Donald Trump
| Updated on: Apr 26, 2026 | 12:25 PM
Share

वॉशिंग्टन डीसी येथील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबाराची घटना घडली. व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी, उपराष्ट्रपती आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधील महत्वाचे चेहरे यावेळी उपस्थित होते. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना मोठा गोळीबार झाला. स्फोटाचे आवाज ऐकू आली. डोनाल्ड ट्रम्प यावेळी उपस्थित पाहुण्यांना संबोधित करत असताना हा प्रकार घडला. सुरक्षा यंत्रणांना पूर्वसूचना मिळाली आणि काही क्षणांतच संपूर्ण वातावरण बदलले. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची सुरक्षा सर्वात महत्वाची होती. सुरक्षा यंत्रणांनी डोनाल्ड ट्रम्प यांना सुखरूप बाहेर काढले. या कार्यक्रमात असा काही प्रकार घडेल याची साधी कल्पनाही कुणी केली नव्हती. गोळीबाराची माहिती मिळताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या भोवती मोठा खेरा सुरक्षा रक्षकांनी घातली.

सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना खाली बसून हॉलमधून बाहेर काढण्यात आले. मिळालेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प भाषण करत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला.  तिथे उपस्थित असलेल्या यूएस सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी तात्काळ कारवाई केली. बंदुकधारी सुरक्षारक्षकांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिशेने सर्वात अगोदर धाव घेतली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

ज्यावेळी हा गोळीबार होत होता, त्यावेळी लोक जीव वाचवण्याकरिता टेबलखाली जाऊन लपवताना दिसले. एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्लेखोराला सुरक्षा यंत्रणांनी पकडले आहे. हल्लेखोराच्या निशाण्यावर डोनाल्ड ट्रम्प होते. यावेळी एका सुरक्षारक्षकाने हल्लेखोराला रोखले असता त्याने गोळीबार करण्यास सुरूवात केली.

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यही त्या कार्यक्रमात उपस्थित होते. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना तात्काळ बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेले. सर्वजण सुरक्षित असल्याचीही माहिती मिळत आहे. थोडीजरी चूक झाली असती तर मोठा अनर्थ घडला असता. डोनाल्ड ट्रम्प ज्या हॉटेलमध्ये होते, तिथे हा गोळीबार झाल्याने जगात एकच खळबळ उडाली. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत काही चूक झाली का? असाही प्रश्न यादरम्यान उपस्थित केला जात आहे.

Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत