AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walkie Talkie Blast : अगदी चित्रपटात दाखवतात तसच, इस्रायलच्या थक्क करणाऱ्या प्लानिंगची गोष्ट, एकदा हे वाचा

Walkie Talkie Blast : इस्रायल सध्या लेबनानमध्ये जे घडवत आहे. त्याची प्लानिंग त्यांनी दोन ते तीन वर्ष आधी केली होती. आधी पेजरमध्ये ब्लास्ट झाले. आता वॉकी-टॉकी, लॅपटॉप, फोन, सोलार पॅनल सिस्टिम, फिंगर प्रिंट रीडिंग मशीन आणि रेडियोमध्ये सीरियल ब्लास्ट सुरु आहेत. इस्रायलने यासाठी पडद्यामागे काय केलं? किती खोलवर प्लानिंग केलेली? त्याची ही गोष्ट एकदा वाचा.

Walkie Talkie Blast : अगदी चित्रपटात दाखवतात तसच, इस्रायलच्या थक्क करणाऱ्या प्लानिंगची गोष्ट, एकदा हे वाचा
Israel
| Updated on: Sep 19, 2024 | 9:58 AM
Share

युद्ध लढताना शत्रूला कसं नामोहराम करायचं हे इस्रायलला चांगलं माहित आहे. मागच्या दोन दिवसांपासून लेबनानमध्ये जे सुरु आहे, त्यामुळे अख्ख जग हैराण झालं आहे. आधी मंगळवारी 17 सप्टेंबरला हिज्बुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये ब्लास्ट झाले. यात 9 जणांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले होते. बुधवारी अनेक ठिकाणी वॉकी-टॉकीमध्ये ब्लास्ट झाले. नेमकं आपल्यासोबत काय घडतय? आणि काय घडणार? याची लेबनानला कल्पना सुद्धा नाहीय. त्यामुळे सध्या लेबनानमध्ये भिती, दहशतीच वातावरण आहे. आज लेबनानमध्ये जे घडतय त्याची प्लानिग इस्रायलने काही वर्ष आधीच करुन ठेवली होती. एखाद्या चित्रपटाला साजेस असं हे कथानक आहे. जे आपण चित्रपटात पाहतो, तसं इस्रायलने प्रत्यक्षात करुन दाखवलय.

हिज्बुल्लाह चीफ नसरुल्लाहने सदस्यांना सेलफोन, इंटरनेट कॉलिंगऐवजी पेजर आणि वॉकी टॉकीचा वापर करण्याचा सल्ला देत होता. त्याचवेळी इस्रायलने ऑपरेशन लेबनानची तयारी केली. नसरुल्लाह यावर्षी फेब्रुवारी महिन्यात हिज्बुल्लाह समर्थकांना संबोधित करताना म्हणाला की, जर इस्रायल हाय-टेक होत असेल तर आपण लो-की होऊया. तुमच्या हातातील सेलफोन इस्रायलचे एजंट आहेत. त्यामुळे पेजर वापरण्याच त्याने आवाहन केलं. इस्रायलला लोकेशन ट्रॅक करता येऊ नये, हा त्यामागे उद्देश होता.

कसा ट्रॅप रचला?

इस्रायलने युरोपच्या हंगेरीत बुडापेस्टमध्ये 2022 साली दोन ते तीन शेल कंपन्या उभ्या केल्या. याच शेल कंपनीपैकी एक होती, BAC Consulting KFT. याच कंपनीने नंतर तैवानच्या Gold Apollo कंपनीसोबत लॉन्ग टर्म पार्टनरशिप केली. या पार्टनरशिप अंतर्गत पेजर आणि वॉकी टॉकी सारखे वायरलेस डिवाइस बनवायला सुरुवात केली.

असं होतं युरोप कनेक्शन

रिपोर्टनुसार, इस्रायलच्या प्लान अंतर्गत उभ्या करण्यात आलेल्या या कंपनीला आंतरराष्ट्रीय पेजर उत्पादक म्हणून दाखवण्यात आलं. हीच कंपनी तैवानच्या गोल्ड अपोलो ब्रांड नेमसह पेजर आणि वॉकी टॉकी तयार करायची. म्हणूनच काल गोल्ड अपोलो कंपनीच्या मालकाने ब्लास्ट झालेले पेजर आम्ही तयार केलेले नाहीत. युरोपमधल्या कंपनीने बनवले आहेत, असं सांगितलं.

सगळा फोकस हिज्बुल्लाहच्या पेजर ऑर्डरवर

इस्रायलच्या तीन इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनी या ऑपरेशनची माहिती दिली. इस्रायलने अशा दोन ते तीन पेजर उत्पादक कंपन्या उभ्या केल्या होत्या. BAC  आपली विश्वसनीयता कायम ठेवण्यासाठी सामान्य ऑर्डर घेऊन डिलीवरी करायचे. पण त्यांचा सगळा फोकस हिज्बुल्लाहच्या पेजर ऑर्डरवर होता.

पेजर खरेदीसाठी इस्रायलने कसं भाग पाडलं?

ही कंपनी PETN स्फोटक असलेली बॅटरी तयार करुन पेजरमध्ये फिट करायची. हे पेजर्स 2022 मध्ये पहिल्यांदाच लेबनानाला पाठवण्यात आले असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. त्यावेळी लेबनानला पाठवलेल्या पेजर्सची संख्या कमी होती. पण इस्रायलने हिज्बुल्लाहवर हल्ले वाढवले. त्यानंतर नसरुल्लाहने मोबाइलचा वापर कमी करण्यावर भाष्य केलं. त्याचवेळी BAC ने पेजर्सच उत्पादन वाढवलं.

इस्रायलसाठी बटण

हिज्बुल्लाहसाठी हे पेजर, वॉकी-टॉकी त्यांची सुरक्षा साधनं होती. पण इस्रायलच्या इंटेलिजन्स अधिकारी या उपकरणांना BUTTON बोलायचे. बटण यासाठी कारण योग्यवेळी बटण दाबून ऑपरेशन प्रत्यक्षात आणायच. 17-18 सप्टेंबरला इस्रायलने हेच बटण दाबून जगाला हैराण केलं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा