AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UAE ने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याबद्दल केला धक्कादायक खुलासा, थेट रिपोर्टमध्ये..

दुबईहून तेल अवीवकडे जाणाऱ्या फ्लायदुबईच्या विमानात धक्कादायक घटना घडली. भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर मोठा हल्ला झाला. हे विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तो पर्यंत भारतीय पायलटने हानून पाडला.

UAE ने भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावरील हल्ल्याबद्दल केला धक्कादायक खुलासा, थेट रिपोर्टमध्ये..
Smit Machchhar
| Updated on: Oct 03, 2026 | 6:15 PM
Share

दुबईहून तेल अवीवकडे निघालेल्या फ्लायदुबईचे विमान FZ1073 च्या कॉकपिटमध्ये जे काही घडले ते भयंकर होते. भारतीय पायलट स्मित मच्छार यांच्यावर मोठा हल्ला करण्यात आला. या विमानातील को पायलट असलेल्या ओमानच्या पायलटने थेट भारतीय पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. यासोबतच विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केला. इस्त्रायलच्या जमिनीवर त्याला हे विमान क्रॅश करायचे होते. पण भारतीय पायलटने त्याला तसे करण्यापासून रोखले. भारतीय पायलट गंभीर जखमी असतानाही त्याने कॉकपिटचा दरवाजा उघडला. प्रवाशांनी त्याला रोखल आणि पकडून ठेवले. त्यानंतर स्मित मच्छार यांनी जखमी होऊनही विमानाला सुरक्षित उतरवले आणि 180 लोकांचा जीव वाचवला. आता ओमानच्या पायलटबद्दल थक्क करणारी माहिती पुढे येतंय.

मिडिया रिपोर्टनुसार, संयुक्त अरब अमिरातच्या तपास एजन्सींच्या म्हणण्यांनुसार, ओमानच्या को पायलटची ओळख हम्माम अल हम्मामी झाली. संयुक्त अरबच्या अमिरात अटॉर्नी जनरलच्या हमाद सैफ अल शम्सी यांच्या माहितीनुसार, हा कोणत्याही प्रकारचा एकमेकांमधील वाद अजिबात नव्हता. हा एक सर्व ठरवलेला नियोजित कट होता. दहशतवादी मोठी कारवाई होती.

युएईच्या अटॉर्नी जनरलच्या रिपोर्टनुसार, 29 वर्षाचा को पायलट हम्माम अल हम्मामीने कॉकपिटमध्ये विमान क्रॅश करण्यासाठी पायलट स्मित मच्छार याच्यावर हल्ला केला. हल्ला केल्यानंतर त्याने विमानाचे पॅनल आपल्या हातात घेतले आणि विमान वेगाने खाली आणले. विमान इतके त्याने खाली आणले की, ते कोसळण्यासाठी काही सेकंदच शिल्लक होती. यादरम्यान गंभीर जखमी असतानाही स्मित यांनी आपत्कालीन कोड पाठवला. शिवाय कॉकपिटचा दरवाजाही उघडला.

यावेळी प्रवाशी थेट कॉकपिटमध्ये आले आणि त्यांनी हल्लेखोर पालयटला पकडून ठेवले. यादरम्यानच ताबुक विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लॅडिंग करण्यात आले. आता ओमानच्या को पायलटबद्दल हादरवणारे खुलासे होताना दिसत आहेत. 2024 मध्ये कट्टरपंथी भूमिकेमुळे आणि त्याच्यावरील संशयामुळे त्याला थेट डेस्कवर ठेवण्यात आले. त्याने पुर्ण कट रचला होता. तपास यंत्रणांकडून त्याची चाैकशी केली जात आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...