AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेत मोठी खळबळ! धक्कादायक व्हिडिओ समोर, थेट विजेता संघ रस्त्यावरून जात असताना..

इराण आणि अमेरिका युद्धात युद्धविराम झाला. मात्र, आता अमेरिकेतून धक्कादायक बातमी पुढे येत आहे. ज्याने मोठी खळबळ उडाली. थेट मोठा गोळीबार अमेरिकेत झाला, ज्याचे धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाली आहेत.

अमेरिकेत मोठी खळबळ! धक्कादायक व्हिडिओ समोर, थेट विजेता संघ रस्त्यावरून जात असताना..
USA
| Updated on: Jun 19, 2026 | 10:59 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्ध अखेर थांबले आहे. या युद्धामुळे जगाची वाट लागली होती. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सतत वाढताना दिसले. भारतासह अनेक देशात महागाई वाढली. अखेर इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविराम करार झाल्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरताना दिसल्या. या युद्धाचा परिणाम भारतात बघायला मिळाले. अखेर इराणच्या काही मागण्या अमेरिकेने मान्य केल्या. आता यादरम्यानच अमेरिकेत मोठी खळबळ उडवणारी घटना घडलीये. न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरमध्ये एकापाठोपाठ एक गोळ्या झाडल्या गेल्याने गोंधळ उडाला. ज्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली, त्यावेळी लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर होते. गोळीबाराचा आवाज ऐकून खळबळ गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतल्याचीही माहिती मिळत आहे.

या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला असून त्यात गोळीबारानंतर लोक सैरावैरा धावताना दिसत आहेत. न्यूयॉर्क अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) मधील विजेते संघ न्यूयॉर्क निक्सच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोअर मॅनहॅटनच्या रस्त्यांवर लोक मोठ्या संख्येने जमले होते. यादरम्यानच ही घटना घडली.

या कार्यक्रमासाठी 10000 पोलिस तैनात करण्यात आले होते. न्यूयॉर्क पोलीस विभागाने सांगितले की, तो परिसर परेड पाहण्यासाठी आलेल्या गर्दीने फुल झाला होता. लोकांची मोठी गर्दी तिथे होती. हे लोक गेल्या आठवड्यात स्पर्धा सुरू झाल्यापासूनच शहरात होते. सोशल मीडियावरही व्हायरल व्हिडीओमध्येही गोळीबाराचा आवाज स्पष्ट ऐकून येतो. गोळीबारानंतर टाइम्स स्क्वेअरमधील लोक जीव वाचवण्याकरिता जिकडे वाट्टेल तिकडे पळताना दिसत आहेत.

गोळीबाराचा आवाज परिसरात स्पष्ट लोकांच्या कानावर पडला. काही उपस्थित लोक थेट सुरक्षेच्या शोधात धावतानाही दिसले. या गोळीबारामुळे मोठी खळबळ उडाली. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होताना दिसत आहेत. ज्यावरून नक्की परिस्थिती तिथे काय होती, हे दिसत आहे. पुन्हा एकदा अमेरिकेत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी