AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Maldives Row : आधी मोदींचा अपमान, आता मालदीवच्या मरियम शिउनाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ

India Maldives Row : "मला या बद्दल माहिती नव्हतं, जे काही झालें, ते अजाणतेपणी झालं" असं मरियमने म्हटलय. "पोस्टमध्ये शेअर केलेल चित्र भारतीय तिरंग्याशी मिळत-जुळत आहे. हा जो चुकीचा समज झाला, त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते" असं मरियम शिउनाने म्हटलं.

India Maldives Row : आधी मोदींचा अपमान, आता मालदीवच्या मरियम शिउनाने पुन्हा भारताविरोधात ओकली गरळ
maldives suspended minister mariyam shiuna
| Updated on: Apr 08, 2024 | 2:10 PM
Share

मालदीवच्या माजी मंत्री मरियम शिउना यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्यानंतर मरियम शिउना यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. त्यांनी पुन्हा एकदा भारताचा अपमान केलाय. मरियम यांनी मालदीवमध्ये होणाऱ्या संसदीय निवडणुकीवरुन देशातील विरोधी पक्ष एमडीपीला टार्गेट केलय. सोबतच भारताचा अपमान करण्यासाठी सोशल मीडियावर एक बनावट पोस्ट शेअर केलीय. मरियम शिउना यांच्या या पोस्टवरुन मोठा वाद निर्माण झालाय. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश आहे. भारतातील सोशल मीडिया युजर्सनी राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांना शिउना यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.

गदारोळामुळे मरियमची पोस्ट सोशल मीडियावरुन हटवण्यात आलीय. सोबतच तिने माफी सुद्धा मागितलीय. मरियम शिउना यांनी पोस्ट शेअर करुन माफी मागितली. “मला या बद्दल माहिती नव्हतं, जे काही झालें, ते अजाणतेपणी झालं” असं मरियमने म्हटलय. “पोस्टमध्ये शेअर केलेल चित्र भारतीय तिरंग्याशी मिळत-जुळत आहे. हा जो चुकीचा समज झाला, त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करते” असं मरियम शिउनाने म्हटलं. मालदीवला भारतासोबतच द्विपक्षीय संबंध महत्त्वाचे आहेत, असंही मरियम शिउनाने म्हटलय.

अशोक चक्राचा अपमान

मरियम शिउनाने सोशल मीडिया एक्स (आधीच ट्विटर) वर शनिवारी 6 एप्रिलला आपला पक्ष PPM साठी एक पोस्ट केलेली. त्या पोस्टमध्ये भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्यातील अशोक चक्राचा अपमान करण्यात आला होता. MDP भारताच्या जाळ्यात अडकतेय अस सुद्धा म्हटलं होतं. पण मालदीवने भारताच्या जाळ्यात फसू नये, असं मरियम शिउनाने लिहिलं होतं.

यानंतर बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरु झाला

मालदीवमधला विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रेटिक पार्टीचा(MDP) पोस्टर बिघडवून हा पोस्टर तयार करण्यात आला होता. मरियम शिउनाला असं करुन भारताचा अपमान करायचा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीपी दौऱ्यावर याच मरियम शिउनाने भारताच्या पंतप्रधानांचा अपमान केला होता. यानंतर बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरु झालेला.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.