फक्त 155 रुपयांमध्ये खरेदी केला 2 BHK फ्लॅट, विशेष सेल मोहिमेत लागली लॉटरी, कोण आहे तो?

अनेक लोक मोठ्या शहरांमध्ये घर खरेदी करण्यासाठी आयुष्यभराची कमाई लावतात तिथे या एका व्यक्तीने फक्त 155 रुपयांमध्ये 2BHK फ्लॅट खरेदी केला आहे. नेमका कसा? जाणून घ्या सविस्तर

फक्त 155 रुपयांमध्ये खरेदी केला 2 BHK फ्लॅट, विशेष सेल मोहिमेत लागली लॉटरी, कोण आहे तो?
Image Credit source: Social media
| Updated on: Nov 12, 2026 | 5:59 PM

भारतातील दिल्ली, मुंबई, नोएडा यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये 2 BHK घर खरेदी करण्यासाठी लाखो ते कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. मात्र, चीनमध्ये एका व्यक्तीला चक्क अवघ्या 155 रुपयांत 2 BHK फ्लॅट मिळाला आहे. विशेष म्हणजे, या फ्लॅटचे क्षेत्रफळ तब्बल 68 चौरस मीटर आहे. ही घटना ऐकायला आश्चर्यकारक वाटत असली तरी ती खरी आहे.

चीनमधील ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ताओबाओ (Taobao) वर आयोजित करण्यात आलेल्या ‘अलीबाबा ऑक्शन डबल 11’ या विशेष डिस्काउंट मोहिमेअंतर्गत या फ्लॅटचा लिलाव करण्यात आला. ताओबाओ हा अलीबाबा समूहाचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. 2009 मध्ये या प्लॅटफॉर्मने ‘डबल 11’ ही विशेष सेल मोहीम सुरू केली होती.

Loading...

या फ्लॅटच्या लिलावात तब्बल 1,677 जणांनी सहभाग घेतला. लिलाव संपेपर्यंत एकूण 1,001 बोली लावण्यात आल्या. अखेर पूर्व चीनमधील जिआंगसू-झेजियांग भागातील एका व्यक्तीने 11 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 155 रुपयांची बोली लावून हा फ्लॅट आपल्या नावावर केला.

फ्लॅटमध्ये राहण्याचा नाही कोणताही विचार

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या (SCMP) वृत्तानुसार, हा फ्लॅट चीनमधील हेइलोंगजियांग प्रांतात एका इमारतीच्या सातव्या मजल्यावर आहे. या फ्लॅटची लिलावासाठी सुरुवातीची किंमत केवळ 1 युआन म्हणजेच सुमारे 14 रुपये ठेवण्यात आली होती. तर कमाल बोली 11 युआन (155 रुपये) निश्चित करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, हा फ्लॅट खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा त्यामध्ये कायमस्वरूपी राहण्याचा कोणताही विचार नाही. त्याने दिलेल्या माहितीनुसार, हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अधूनमधून फिरण्यासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी तो या फ्लॅटचा वापर करणार आहे.

मालकी हक्कासाठी भरावे लागणार अतिरिक्त पैसे

अवघ्या 155 रुपयांत फ्लॅट मिळाला असला, तरी खरेदीदाराला यासाठी आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत. फ्लॅटची बोली आणि प्लॅटफॉर्मचे व्यवहार शुल्क त्याने भरले आहे. मात्र, फ्लॅटची मालकी अधिकृतपणे स्वतःच्या नावावर करण्यासाठी त्याला सुमारे 2,000 युआन म्हणजेच 28 हजार रुपये कायदेशीर कर भरावा लागणार आहे.

5.6 लाखांचा फ्लॅट मिळाला अवघ्या 155 रुपयांत

या संपूर्ण व्यवहारातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, या सेकंडहँड फ्लॅटची बाजारातील किंमत सुमारे 40,000 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार 5.6 लाख रुपये आहे.

मात्र, ‘अलीबाबा ऑक्शन डबल 11’ या विशेष प्रमोशनल मोहिमेअंतर्गत प्लॅटफॉर्मने किंमतीतील फरकाची सबसिडी दिल्यामुळे हा फ्लॅट इतक्या कमी किमतीत उपलब्ध झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us