Samreen Kaur : अर्शदीप सिंहची होणारी पत्नी समरीन कौर आहे तरी कोण? ती सध्या काय करते? जाणून घ्या तिचं शिक्षण आणि करिअर
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याने नुकताच अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौर हिच्यासोबत न्यूझीलंडमध्ये साखरपूडा केला. अर्शदीप क्रिकेटर आहे हे तर माहित आहे पण त्याची होणारी बायको समरीन कौर नक्की किती शिकलेली आहे. सध्या ती काय करते जाणून घ्या.

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह सध्या मैदानावरील कामगिरिसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अर्शदीपने 11 नोव्हेंबर 2026 रोजी अभिनेत्री आणि मॉडेल समरीन कौर हिच्यासोबत साखरपूडा केला. न्यूझिलंडमध्ये समुद्रकिनाऱ्यालगत अर्शदिपने गुडघ्यावर बसून समरीनला लग्नाची मागणी घातली. या खास क्षणांचे फोटो दोघांनी सोशल मीडीयावर शेअर केले आणि चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. पण समरीन कौर नेमकी आहे तरी कोण? तिचं शिक्षणं किती झालंय? आणि ती अभिनयाच्या क्षेत्रात कशी आली? जाणून घ्या….
समरीन कौरचा जन्म 7 सप्टेंबर 1999 रोजी जम्मू – काश्मीरमध्ये झाला. तिचं कुटुंब शिक्षणाला महत्त्व देणारं आहे. तिची आई प्राध्यापक असून वडिलही शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. समरीनने पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ ऑर्टस अँड कॉमर्समधून बी. कॉम ही पदवी मिळवली. त्यानंतर तिने चंदीगडमधून एमबीएचं शिक्षणं पूर्ण केलं. म्हणजेच अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात येण्याआधी तिने उच्च शिक्षण पूर्ण केलं आहे.
समारीनच्या करिअरला खरी दिशा मिळाली ती 2018 मध्ये. याच वर्षी तिने फेमिना मिस इंडिया स्पर्धेत जम्मू काश्मीरचं प्रतिनिधित्व केल आणि राज्यस्तरीय अंतिम फेरीनंतर मजल मारली. या स्पर्धेमुळे तिला मॉडेलिंगच्या क्षेत्रात ओळख मिळाली. त्यानंतर तिने अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला.
समरीनने रणवीरच्या सिंहच्या 83 या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर काम केलं. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटात तिने क्रिकेटपटू बलविंदर सिंधू यांच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. याशिवाय ती ‘नेल पॉलिश’ या वेब सीरीजमध्येही दिसली. ‘सरदारजी 2’, ‘जिंद माही’ , यांसारख्या पंजाबी चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे. तिने संगीतविश्वातही आपली छाप पाडली आहे.
अर्शदीप आणि समरिन यांच्या नात्याची चर्चा 2026 मध्ये सुरू झाली होती. जुलैमध्ये अर्शदीपने दोघांचे फोटो शेअर करत ‘माय पर्सन’ असं कॅप्शन दिलं होतं. नुकताच साखरपूडा पार पडल्याने किक्रेट विश्वात आता एका नव्या जोडीची चर्चा रंगली आहे.
