AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्लाह हू अकबर-फ्लाइट बॉम्बने उडवेन.. भर विमानात पॅसेंजरचा हंगामा, व्हिडीओ व्हायरल

लंडनच्या विमानतळावरून ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेट एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. ज्यामध्ये हंगामा करणाऱ्या एका प्रवाशाने मोठ्याने ओरडून विमान बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. तसेच त्याने ट्रम्प मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे एकच गदारोळ माजला. अखेर त्याला स्कॉटलँडमध्ये अटक करण्यात आली.

अल्लाह हू अकबर-फ्लाइट बॉम्बने उडवेन.. भर विमानात पॅसेंजरचा हंगामा, व्हिडीओ व्हायरल
भर विमानात प्रवाशाचा हंगामााImage Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Jul 28, 2025 | 9:33 AM
Share

लंडनच्या ल्युटन विमानतळावरून ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेट एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने अचानक गोंधळ घातला आणि एकच गदारोळ माजला. हंगामा करणाऱ्या प्रवाशाने जोरजोरात ओरडतच ते विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्याने मोठमोठ्याने ओरडत अमेरिका मुर्दाबाद असे नारे लगावले, ट्रंप मुर्दाबाच्या घोषणाही दिल्या. विमानत उभं राहून असा गोंधळ घालणाऱ्या इसमाला अखेर बेड्या ठोकत अटक करण्यात आली असून त्याची चौकशीदेखील करण्यात येत आहे.

जेव्हा हे विमान ग्लासगो विमानतळावर उतरले तेव्हा ट्रम्प मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला स्कॉटलंडमधून अटक करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी विमान बॉम्बने उडवून देईन असं म्हणत तो इसम मोठमोठ्याने ओरडत होता. याशिवाय, व्हिडिओमध्ये तो इसम’अमेरिका मुर्दाबाद’, ‘ट्रम्प मुर्दाबाद’ आणि ‘अल्लाह हू अकबर’ अशा घोषणा देत असल्याचेही दिसत होता. त्यानंतर विमानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याला पकडून खाली पाडलं.

मोठा संघर्ष टळला

मिळालेल्या  माहितीनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाचे वय 41 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दहशतवाद विरोधी विभाग चौकशी करत आहे. या गोंधळानंतरही विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कोणत्याही प्रवाशाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही, असे ग्लासगो टाइम्सच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. .

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाच दिवसांच्या स्कॉटलंड दौऱ्यावर गेले आहेत. युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी ट्रम्प यांच्या ऐतिहासिक करारामुळे ट्रान्सअटलांटिक टॅरिफवरील वाद संपला आहे, ज्यामुळे मोठ्या संघर्षाची शक्यता टळली आहे. ट्रम्प यांच्या भेटीलाही विरोध केला जात आहे.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.