AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात असं पहिल्यांदाच घडलंय… भूकंपात मृत्यू, दोन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये, अन् दफन होण्यापूर्वीच उठून उभा राहिला

अहमद यांचं हृदय धडधडू लागलं. अहमद यांच्या मृतदेहाची हालचाल होत असल्याचं पाहून अहमद यांचे कुटुंबीयही आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अहमद यांना रुग्णालयात दाखल केलं.

जगात असं पहिल्यांदाच घडलंय... भूकंपात मृत्यू, दोन दिवस मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये, अन् दफन होण्यापूर्वीच उठून उभा राहिला
Dead Man AliveImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 08, 2023 | 12:07 PM
Share

अंकारा : एखादा माणूस मेल्यानंतर पुन्हा जिवंत होतो का? त्याचं उत्तर नाही असंच आहे. कारण एकदा जीव गेल्यानंतर माणूस पुन्हा जिवंत होणं अशक्यच आहे. पण सीरियात मात्र एक वेगळीच घटना घडली आहे. त्यामुळे सर्वच लोक हैरान झाले आहेत. एवढ्या भूकंपाच्या दु:खात असूनही सीरियातील लोकांच्या तोंडी सध्या हीच एक गोष्ट आहे. ती म्हणजे, एक माणूस भूकंपात मेला. त्याचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह दफन करण्यासाठी नेण्यात आला. दफनविधी सुरू असतानाच अचानक हा माणूस उठून उभा राहिला. त्यामुळे लोक घाबरून पळाले. मेलेला माणूस दोन दिवसानंतर जिवंत झाल्याचं पाहून नातेवाईकच काय डॉक्टरही आश्चर्यचकित झाले.

या व्यक्तीचं नाव अहमद अल मघरीबी असं आहे. सीरियाच्या अतारिब शहरात भयानक भूकंप आला होता. त्यावेळी अहमद हे तिथेच होते. या भूकंपात शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या. अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेले. अहमद हे त्यापैकीच एक. त्यांचाही ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. महत्प्रयासाने त्यांचा मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढला. त्यानंतर डॉक्टरांनी दोन दिवस त्यांचा मृतदेह कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवला. त्यांची ओळख पटावी, त्यांच्या नातेवाईकांना त्यांचा मृतदेह देता यावा म्हणून डॉक्टरांनी हा निर्णय घेतला होता.

अन् अचानक हालचाल सुरू झाली

भूकंपात आपले नातेवाईक गमावलेल्यांनी रुग्णालयांमध्ये जाऊन मृतदेह पाहण्यास सुरुवात केली. अहमद यांच्या घरच्यांनीही रुग्णालयांच्या प्रत्येक शवागरात जाऊन पाहणी केली. अखेर एका शवागरात अहमद याचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर सोपस्कार करून डॉक्टरांनी अहमद यांचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला. त्यानंतर अहमद यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. त्यांना दफन करण्यासाठी कब्रस्तानात नेण्यात आलं. मात्र, कब्रस्तानात गेल्यावर अहमद यांच्या मृतदेहाची अचानक हालचाल सुरू झाली.

जगातील विरळे

अहमद यांचं हृदय धडधडू लागलं. अहमद यांच्या मृतदेहाची हालचाल होत असल्याचं पाहून अहमद यांचे कुटुंबीयही आश्चर्यचकीत झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अहमद यांना रुग्णालयात दाखल केलं. अहमद यांना जिवंत पाहून डॉक्टरही आश्चर्यचकीत झाले. डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या सुरू केल्या. ते स्वस्थ आणि निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ज्यांच्या हृदयाची धडधड थांबली होती. पण नंतर ती सुरू झाली, अशा जगातील थोड्या लोकांपैकी अहमद हे एक आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.