सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

मिया खिलफानं शेतकरी आंदोनाला पाठिंबा देत एक पोस्ट केली आहे. तिनं शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर केला आहे. (Mia Khalifa Farmer Protest)

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?
मिया खलिफा
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 2:36 PM

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन दोन महिन्यांहून अधिक काळ सुरु आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं होतं. रिहानानंतर एकेकाळी पॉर्नस्टार म्हणून काम केलेल्या मिया खलिफानं शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. मिया खिलफानं शेतकरी आंदोनाला पाठिंबा देत एक पोस्ट केली आहे. तिनं शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर केला आहे. (Mia Khalifa tweeted and Instagram post for support of Farmer Protest In India)

मिया खलिफाची इंस्टाग्राम स्टोरी

मिया खलिफानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधील फोटोवर शेतकऱ्यांना मारणं बंद करा असा उल्लेख करण्यात आला आहे. त्या पोस्टरवर शेतकरी आंदोलनावेळी दिल्लीमधील इंटरनेट बंद करण्यात आलं हे दिल्लीत काय चाललं आहे, असा सवाल तीन केला आहे. त्याशिवाय मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाच्या समर्थना्र्थ ट्विट देखील केली आहेत.

Mia Khalifa Instagarm story 1

मिया खलिफा इंस्टाग्राम स्टोरी

मिया खलिफाची ट्विट

शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ मिया खलिफानं दोन ट्विट केली आहेत. पहिल्या ट्विटमध्ये मिया खलिफानं कोणत्या मानवधिकारांचं उल्लंघन होत आहे? त्यांनी नवी दिल्लीच्या परिसरातील इंटरनेट बंदल केलं आहे? #farmerprotest तर दुसऱ्या ट्विटमध्ये Paid Actors, huh? पुरस्कार द्यायच्या वेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जाणार नाही. मी शेतकऱ्यांसोंबत उभी आहे, असही मिया खलिफा म्हणते.

मिया खलिफा कोण आहे?

मिया खलिफा एकेकाळी पॉर्नस्टार राहिलेली आहे. तिचे जगभरात कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटरवर तिचे अनेक लाखो चाहते आहेत. मिया खलिफानं ऑक्टोबर 2014 मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. मिया जन्मानं कॅथॉलिक आहे पण तिचा धर्मावर विश्वास नाही. 2016 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2016 मध्ये मिया खलिफा सर्वाधिक लोकप्रिय पॉर्नस्टार होती. मिया खलिफानं स्पोर्टसं कॉमेंटेटर आणि मॉडेल म्हणून देखील काम केलेले आहे.

View this post on Instagram

A post shared by Mia K. (@miakhalifa)

मिया खलिफाचं दुसरं नाव मिया कलिस्ता आहे. तिने आतापर्यंत 22 अडल्ट फिल्ममध्ये काम केलं आहे. बिग-बॉसच्या 9 व्या हंगामात मिया खलिफा चर्चेथ आली होती. पॉर्नस्टार होण्यापूर्वी मिया एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. मिया खलिफाला आंतकवाद्यांकडून धमकी देखील मिळाली होती.

View this post on Instagram

A post shared by Mia K. (@miakhalifa)

पॉर्नस्टार राहिलेल्या मिया खलिफाला फूटबॉल, इतिहास याची आवड आहे. तिनं फेब्रुवारी 2011 मध्ये एका अमेरिकन व्यक्तीसोबत विवाह केला होता. मिया खलिफाला ट्विटरवर 32 लाख फॉलोअर आहेत. तर इंस्टाग्रामवर 2 कोटींहून अधिक फॉलोअर आहेत. तिन पॉर्न क्षेत्रात करिअर केल्यानंतर तिच्या आई वडिलांनी बोलणं बंद केलं होतं. मिया खलिफा पहिल्यांदा मुस्लीम होती सध्या ती ख्रिश्चन आहे. मिया खलिफाकडे जवळपास तीन कोटींपेक्षा अधिक संपत्ती आहे. मात्र, सध्या मिया खलिफानं पॉर्न इंडस्ट्री सोडली आहे.

View this post on Instagram

A post shared by Mia K. (@miakhalifa)

पॉपस्टार रिहानाचं ट्विट

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं वस्तुस्थिती तपासण्याचं आवाहन

संबंधित बातम्या:

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?

(Mia Khalifa tweeted and instagram post for support of Farmer Protest In India)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.