मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

मोदी सरकारविरोधात जगातल्या प्रसिद्ध पॉपस्टारचं ट्विट, इंटरनेट बंदीवर सवाल, कोण आहे रिहाना?

दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेताकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Feb 03, 2021 | 7:57 AM

नवी दिल्ली : मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे. (rihanna news why arent we talking about this pop star rihanna tweet against farmers protest)

बारबडोजमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकेत पॉपस्टार म्हणून नाव कमावणाऱ्या रिहाना नेहमीच डेमोक्रॅट्सवर प्रभावी असते. ट्रम्प सरकारने इमिग्रेशन संदर्भात घेतलेल्या निर्णयावरही रिहानाने टीका केली होती. यावेळीही तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यामध्ये ट्रम्प यांना टॅग केलं होतं. तर रिहानाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठिंबा दर्शविला होता. एकंदरीतच काय तर सामाजिक विषयांवर रिहाना नेहमीच प्रतिक्रिया देते. गेल्या काही दिवसांआधीच तिने म्यानमारच्या विषयावर ट्विटही केलं होतं. यामध्ये माझ्या प्रार्थना म्यानमारसोबत असल्याचं तिने म्हटलं होतं.

कोण आहे रिहाना ?

रिहानाचं पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी आहे. तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला झाला होता. ती एक बारबेडिअन पॉपस्टार, मॉडल आणि प्रसिद्ध व्यावसायिकसुद्धा आहे. बारबाडोसमध्ये जन्मलेल्या, रिहानाला वयाच्या 16 व्या वर्षी रेकॉर्डिंग करिअरसाठी रेकॉर्ड निर्माता इव्हान रॉजर्सने अमेरिकेत बोलावलं होतं. 2005 मध्ये, रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम, म्युझिक ऑफ द सन प्रसिद्ध केला होता. जो बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला.

एका वर्षापेक्षाही कमी वेळात रिहानाने तिचा दुसरा स्टुडिओ अल्बम, ए गर्ल लाइक मी (2006) प्रसिद्ध केला. तिच्या या अल्बम्सला नागरिकांनी प्रचंड पसंती दिली. हा बिलबोर्ड अल्बमवरील चार्टच्या पहिल्या पाचमध्ये पोहोचला होता. या आंतरराष्ट्रीय पॉपस्टारच्या चाहत्यांची भारतातही कमी नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकारात 32 वर्षीय रिहानाचं नाव आहे.

इंटरनेट बंद करण्याबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे?

कृषी कायद्याविरोधात पेटलेलं कृषी आंदोलन चिघळत असताना सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 2 फेब्रुवारी 11 रोजी गृह मंत्रालयाने सिंगू, गाजीपूर, टिकारी सीमा आणि आसपासच्या भागातील इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यावर रिहानाने प्रश्चचिन्ह उपस्थित केलं आहे. खरंतर, 26 जानेवारीपासून इंटरनेट सेवेवर तीनदा बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी 26 जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचाराच्या वेळी इंटरनेटवर बंदी होती. (rihanna news why arent we talking about this pop star rihanna tweet against farmers protest)

संबंधित बातम्या – 

शिवसेना-भाजपचा मनसेला ‘दे धक्का’; राज ठाकरेंसाठी ‘हा’ मराठी अभिनेता पुढे सरसावला

‘आर्टिकल 15’ नंतर आयुष्मान खुराना आणि अनुभव सिन्हा पुन्हा एकत्र; ‘या’ चित्रपटात करणार काम!

अनुराग कश्यपच्या लेकीने शेअर केला हॉट फोटो, ‘सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच….!’

Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!

(rihanna news why arent we talking about this pop star rihanna tweet against farmers protest)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें