AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आर्टिकल 15’ नंतर आयुष्मान खुराना आणि अनुभव सिन्हा पुन्हा एकत्र; ‘या’ चित्रपटात करणार काम!

अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana)  त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

‘आर्टिकल 15’ नंतर आयुष्मान खुराना आणि अनुभव सिन्हा पुन्हा एकत्र; 'या' चित्रपटात करणार काम!
| Updated on: Feb 02, 2021 | 7:58 PM
Share

मुंबई : अभिनेता आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana)  त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. आयुष्मान गेल्या काही दिवसांपासून ईशान्य भागाच्या दौरावर अनुभव सिन्हासोबत होता. आजच आयुष्मानने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाचे नाव देखील पुढं आले आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा निर्मित असून चित्रपटाचे नाव ‘अनेक’ (Anek) असे आहे. आयुष्मानने 2 फोटो शेअर केले आहेत. (Ayushmann Khurrana will be seen in the movie Anek)

त्यामध्ये आयुष्मानचा लूकही थोडा वेगळा दिसत आहे. एका फोटोमध्ये अनुभव सिन्हा आणि आयुष्मान खुराना दिसत आहेत तर दुसऱ्या फोटोमध्ये आयुष्मान जीपमध्ये बसलेला दिसत आहे. हे फोटो शेअर करताना आयुष्मानने लिहिले की, अनुभव सिन्हा सर यांच्याशी पुन्हा एकत्र काम करण्यास मी खूप उत्साही आहे. हा चित्रपट अनुभव सिन्हा आणि भूषण कुमार निर्मित आहे.

आयुष्मानचे चंडीगढ़ करे आशिकी आणि डॉक्टर जी हे चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांच्या ‘चंदीगड करे आशिकी’ या चित्रपटाचं चित्रीकरण कोरोना काळात सुरू झालं होतं आणि आता हे चित्रीकरण संपलं आहे. या चित्रपटाचं दोन महिन्यांपूर्वी चित्रीकरण सुरू करण्यात आलं होतं. ‘चंदीगड करे आशिकी’च्या चित्रीकरणानंतर वाणी कपूरनं फोटो शेअर केले होते.

‘चंदीगड करे आशिकी’चं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण टीमनं धमाल पार्टी केली होती. वाणीनं पार्टीचे काही फोटो शेअर केले होते, या फोटोमध्ये वाणी, आयुष्मान आणि दिग्दर्शक अभिषेक कपूर केक कापताना दिसत होते. वाणीनं ‘या चित्रपटाचं चित्रीकरण संपलं आहे.

संबंधित बातम्या : 

अनुराग कश्यपच्या लेकीने शेअर केला हॉट फोटो, ‘सोशल मीडियावर जाळ अन् धुर संगटच….!’

Video | रितेशसोबत नाचताना खाली पडली जेनेलिया, अभिनेत्याने शेअर केला गमतीदार व्हिडीओ!

कुणाच्याही वाट्याला असे दिवस येऊ नयेत, लग्न झाल्यानंतर या 5 अभिनेत्रींनी नरक यातना सोसल्या…!

(Ayushmann Khurrana will be seen in the movie Anek)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.