Video: त्यानं समुद्रात पोहोत, मोरोक्कोतून स्पेन गाठलं, तेही पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या आधारावर, हादरवणारी स्टोरी

स्पेनमधलं सेऊटा गाठण्यासाठी ह्या मुलानं मोरोक्कोतून समुद्रात उडी घेतली. सोबत त्यानं स्वत:ला पाण्याच्या रिकाम्या बाटल्या बांधल्या. | Migrant Boy Swimming From Morocco To Spain

Video: त्यानं समुद्रात पोहोत, मोरोक्कोतून स्पेन गाठलं, तेही पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांच्या आधारावर, हादरवणारी स्टोरी
Migrant boy swims from Morocco to Spain
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 7:37 AM

माद्रिद: स्पेन आणि मोरोक्कोत स्थलांतरितांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर होताना दिसतो आहे. हजारो मोरोक्कन नागरिक हे देश सोडून स्पेनमध्ये (Spain) दाखल होतायत. त्यासाठी ते स्वत:चा जीव धोक्यात घालतायत. स्पेनमध्ये पोहोचण्यासाठी समुद्र पार करावा लागतो. त्यासाठी काही जण जीवाची बाजी लावतायत. त्यातच एका अल्पवयीन मुलानं जे केलं ते हादरवून टाकणारं आहे. (Heartbreaking Footage Shows Migrant Boy Swimming From Morocco To Spain Using Plastic Bottles To Stay Afloat)

नेमकं काय घडलं?

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियासह सगळीकडे फिरतो आहे. एकीकडे इस्त्रायल पॅलेस्टाईन यांच्यातल्या संघर्षात मुलं होरपळली आहेत. त्यानं  जग आधीच सुन्न झालं आहे. त्यातच आता मोरोक्को स्पेन बॉर्डरवर जे काही घडतं आहे तेही जगाला जागं करणारं आहे. जवळपास 8 हजार मोरोक्कन नागरिक अवैधरित्या स्पेनमध्ये दाखल झालेत. त्यातच एक अल्पवयीन मुलगा आहे. त्यानं स्पेन गाठण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. स्पेनमधलं सेऊटा गाठण्यासाठी ह्या मुलानं मोरोक्कोतून समुद्रात उडी घेतली. सोबत त्यानं स्वत:ला पाण्याच्या रिकाम्या बाटल्या बांधल्या. आणि तशाच अवस्थेत तो पोहोत पोहोत स्पेनच्या सेऊटात पोहोचला. त्याचा हा संघर्ष दाखवणारा रॉयटर्सचा व्हिडीओ सध्या जगभर चर्चेत आहे.

मुलगा सैनिकांना काय म्हणाला?

स्पेनच्या बॉर्डरवर पोहोचताच सैनिकांनी त्याला ताब्यात घेतलं. तेव्हा तो धायमोकलून रडायला लागला. मी मरण पत्करेन, इथं थंडीत गोठून मेलो तरी चालेल पण परत मोरोक्कोला जाणार नसल्याचं तो सैनिकाला म्हणाला. आतापर्यंत मोरोक्कोतून 8 हजारपेक्षा जास्त जण एक तर समुद्रातून पोहून किंवा सीमेवरची तार तोडून स्पेनमध्ये दाखल झालेत. पण त्यापैकी कुणीही अशा अल्पवयीन वयात इथं गोठून मरेन थंडीत पण परत जाणार नाही अशी भाषा वापरल्याचं ऐकलं नसल्याचं स्पॅनिश सैनिकानं सांगितलं. सैनिकांनी ताब्यात घेतल्यानंतर मुलाला स्थलांतरीतांच्या कँपमध्ये दाखल करण्यात आलं.

रिकाम्या बॉटल्सचा कसा फायदा झाला?

मोरोक्को ते स्पेन यांच्या सीमेतलं अंतर हे कमीत कमी 14 कि.मी. आहे. याचाच अर्थ असा की, त्या अल्पवयीन मुलानं समुद्रमार्गे यापेक्षा जास्त अंतर पोहोत पार केलेलं आहे. त्यासाठी त्यानं पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा आधार घेतला. समुद्राच्या लाटांवर ज्यावेळेस तो अल्पवयीन मुलगा थकला त्यावेळेस त्याला तरंगत ठेवण्यासाठी, श्वास घेण्यासाठी, काही काळ तशीच विश्रांती घेण्यासाठी ह्या रिकाम्या बाटल्यांनीच आधार दिला. त्याच बाटल्यांच्या आधारावर तो स्पेनच्या काठावर पोहोचला. विशेष म्हणजे स्पेनमध्ये अल्पवयीन मुलांना त्यांच्या देशात परत पाठवणं बेकायदेशीर आहे, त्यामुळेच त्या अल्पवयीन मुलाला सध्या तरी स्पेनमध्ये जागा मिळाल्याचं दिसतं आहे. स्पेनमध्ये पोहोत आलेल्या किंवा तारेच्या कुंपनावरुन उड्या मारून दाखल झालेल्या 6 हजारपेक्षा जास्त स्थलांतरीतांना स्पेननं मोरोक्कोला परत पाठवलं आहे. (Heartbreaking Footage Shows Migrant Boy Swimming From Morocco To Spain Using Plastic Bottles To Stay Afloat)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.