मास्कोत दहशतवादी हल्ल्यानंतर पुतिन आक्रमक, म्हणाले, शपथ घेतो, कोणालाही सोडणार नाही

मास्कोतील हल्ल्यातील आरोपीचा व्हिडिओ आला आहे. पैशाच्या बदल्यात निरपराध लोकांचा जीव घेण्याचे त्याचे भयावह मिशन उघड केले. आपण पैशांसाठी हा हल्ला केल्याचे तो सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत सांगत आहे. या हल्ल्यासाठी त्याला पाच दशलक्ष रूबल मिळाले.

मास्कोत दहशतवादी हल्ल्यानंतर पुतिन आक्रमक, म्हणाले, शपथ घेतो, कोणालाही सोडणार नाही
रशिया राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुनित
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 8:48 AM

रशियाची राजधानी मास्कोमधील क्रॉकस सिटी हॉलमध्ये शुक्रवारी सशस्त्र हल्ला झाला. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या १४३ वर गेली आहे. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने (इसिस) घेतली आहे. या हल्ला प्रकरणात ११ संशयितांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान रशियातील हल्ल्यानंतर राष्ट्रध्यक्ष व्लादिमिर पुनित प्रचंड संतापले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिली. त्यांनी म्हटले की, शपथ घेतो, एकाही व्यक्तीला सोडणार नाही. पुनित यांनी दावा केला की, हल्ल्यानंतर बंदूकधारी आरोपी युक्रेनमध्ये पळून गेले. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली आहे.

इसिसने घेतली जबाबदारी

मास्को हल्ल्याची जबाबदारी ISIS ने या आत्मघातकी संघटनेने घेतली आहे. इसिसने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की आमच्या सैनिकांनी मॉस्कोच्या बाहेरील कॉन्सर्ट हॉलवर हल्ला केला आहे. सर्व हल्लेखोर आता सुरक्षितपणे त्यांच्या लपलेल्या ठिकाणी परतले आहेत.

हे सुद्धा वाचा

संशयिताचा दावा, पाच लाखांसाठी

हल्ल्यात अटक करण्यात आलेल्या संशयिताने शांतपणे हल्ल्यातील आपली भूमिका कबूल केली. त्याने तुर्की ते रशियापर्यंतचा त्याचा प्रवास सांगितला. पैशाच्या बदल्यात निरपराध लोकांचा जीव घेण्याचे त्याचे भयावह मिशन उघड केले. आपण पैशांसाठी हा हल्ला केल्याचे तो सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत सांगत आहे. या हल्ल्यासाठी त्याला पाच दशलक्ष रूबल मिळाले. परिणामांचा विचार न करता केवळ मोठ्या रकमेच्या आमिषाने आपण हा हल्ला केल्याचे त्याने म्हटले.

त्याने चौकशीत सांगितले की, “एका इस्लामिक धर्मगुरूने मला सांगितले की जा आणि लोकांना मारून टाका, मग ते कोणत्याही प्रकारचे असोत.” त्याच्याशी एका इस्लामिक धर्मगुरूच्या सहाय्यकाने संपर्क केला होता. तो त्यांचा टेलिग्रामवर फॉलोवर आहे.

त्या हॉलमध्येच झाली होती मिस युनिव्हर्स स्पर्धा

क्रोकस सिटी हॉल 2009 मध्ये क्रॅस्नोगोर्स्की येथे बांधला गेला. यात तीन वेगवेगळी सभागृहे आहेत. त्यापैकी एकाची क्षमता 7 हजार लोकांची आहे आणि दुसऱ्याची क्षमता 4 हजारांपेक्षा जास्त आहे. एवढेच नाही तर लोकांच्या सोयीसाठी येथे थिएटरही आहे. येथे तीन हजारांहून अधिक लोक बसू शकतात. क्रोकस सिटी हॉलमध्ये 2013 मध्ये मिस युनिव्हर्स स्पर्धाही आयोजित करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.