मोसादची खतरनाक लेडी किलर… खोमेनीच्या घरात घुसून 9 अणू शास्त्रज्ञांना ढगात पोहोचवलं; कसं घडलं?
इराण आणि इस्रायलमधील युद्धात, मोसादच्या महिला एजंट्सने इराणी अणुशास्त्रज्ञांवर हनीट्रॅपचा वापर करून जीवघेणा हल्ले केले. कॅथरीन पेरेज नावाच्या एका एजंटने, इस्लाम स्वीकारून स्थानिक समुदायात मिसळून, 9 शास्त्रज्ञांना ठार मारले. तिने इराणी अधिकाऱ्यांच्या पत्नींमार्फत संपर्क साधून टार्गेटवर हल्ले केले. मोसादच्या या महिला एजंट पुरुष एजंटपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे दिसून येते.

युद्ध सुरू असताना किंवा त्यापूर्वी अनेक देश शत्रू राष्ट्रात युक्त्या प्रयुक्त्या वापरत असतात. सध्या इराण आणि इस्रायल दरम्यान युद्ध सुरू आहे. या युद्धात इस्रायल त्यांच्या मोसाद या गुप्तचर संघटनेचा अत्यंत खुबीने वापर करत आहे. मोसाद ही जगातील अव्वल दर्जाची गुप्तचर संघटना आहे. या संघटनेने इराणमध्ये जे चमत्कार घडवलेत त्याने सर्वच थक्क झाले आहेत. इराणमध्ये घुसून मोसादच्या खतरनाक एजंटांनी थेट इराणच्या अणु शास्त्रज्ञांच ढगात पोहोचवलं आहे. विशेष म्हणजे तेही एका लेडी एजंटच्या माध्यमातून. इराणचे हे सर्व अणु शास्त्रज्ञ हनीट्रॅपचे शिकार झाले आहेत. नेमकं हे ऑपरेशन करण्यात आलं, त्यावर टाकलेला हा प्रकाश.
सुंदर तरुणी एकमेव हत्यार
मोसादमध्ये अत्यंत सुंदर ललना आहेत. हातात हायटेक शस्त्रे आणि समोरच्यांना घायाळ करणारी अदा या बळावर या ललना शिकार करतात. मोसादमध्ये अत्यंत सुंदर महिलांनाच एन्ट्री मिळते. त्यामुळेच मोसादचं हनीट्रॅपचं जाळं अत्यंत सशक्त झालं आहे. त्यामुळेच मोसादचं मिशन अत्यंत कुशलतेने पार पडतं. विशेष म्हणजे मोसादच्या या लेडी एजंट्स शत्रूंना दिसत नाहीत आणि जगासमोरही येत नाहीत. त्या काळजात घुसून जीव घेतात. गरज पडल्यास रक्तही शोषून घ्यायला मागे पुढे पाहत नाहीत. मोसादनेही या महिलांना तशा पद्धतीनेच तयार केलेलं असतं. म्हणजे गरज पडल्यास हनीट्रॅप करणं, शरीर दाखवून टार्गेटला जाळ्यात ओढणं आणि विषय फारच पुढे गेला तर ऑन दी स्पॉट मर्डर करणं, या सर्व गोष्टी या महिलांना शिकवल्या जातात. एकदा का तुम्ही मोसादच्या या ललनांच्या जाळ्यात अडकलात तर जगाला मुकलाच म्हणून समजा. 13 जून रोजी इराणसोबत इस्रायलचं युद्ध सुरू झालं आणि या काळात या ललनेने इराणच्या 9 अणु शास्त्रज्ञांचा जीव घेतला.
हनीट्रॅपचा शिकार झालेले इराणचे 9 एक्सपर्ट
1. फेरेयदून अब्बासी, ॲटॉमिक इंजीनिअरिंग
2- मोहम्मद महदी तेहरानची, भौतिक शास्त्रज्ञ
3- अकबर मतलाली जादेह, केमिकल इंजीनिअरिंग
4- सईद बेराजी- मटेरियल इंजीनियरिंग, विशेषज्ञ
5- अमीर हसन फकही, भौतिकी विज्ञानी
6- अब्द अल-हामिद, ॲटॉमिक रिएक्टर
7- मंसूर असगरी, भौतिक शास्त्रज्ञ
8- अहमद रजा दरयानी – ॲटॉमिक इंजीनिअरिंग
9- अली बखायी काथेरेमी – मेकॅनिकल इंजीनिअरिंग
‘मोसादची ब्यूटी’ कोण?
मोसादच्या या ललना कोण? या प्रश्नाचं उत्तर इराण शोधेपर्यंत या ललना इराणमधून गायब झाल्या होत्या. इराणी एक्सपर्टस, या सर्व 9 हत्यांचे टायमिंग, पॅटर्न आणि हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले हत्यार यांची साखळी जोडली. त्यावेळी त्यांना फक्त या खूनी ललनाचं नाव समोर आलं.
कॅथरीन पेरेज शेकेडने केला गेम
9 शास्त्रज्ञांना जीवे मारल्यानंतर कॅथरीन पेरेज कुठे गेली हे कुणालाच माहीत नाही. ती फ्रान्सची नागरिक होती, एवढीच माहिती आहे. मोसादने तिला इराणमध्ये खास ऑपरेशनसाठी ट्रेंड केलं होतं. ऑपरेशन पार पाडण्यासाठी कॅथरीन इराणला गेली. तिथे तिने इस्लाम कबुल केला. त्यानंतर एका वर्षाच्या आत ती सीनिअर ऑफिशियल्सच्या घरापर्यंत पोहोचली.
इराणच्या गुप्तचर विभागाने आणखी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या मते, मोसादची एजंट कॅथरीनने इस्लामची प्रॅक्टिस केल्यानंतर स्थानिक शिया समुदायात ती इतकी मिसळली की कुणाला तिच्याबद्दलचा संशयच आला नाही. त्यानंतर ती सैनिकी अधिकारी, शास्त्रज्ञ आणि इंजिनियरांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली. या तज्ज्ञांना नंतर तिने टार्गेट केलं होतं.
तज्ज्ञांच्या बायकांची मदत
कुटुंबाशी संपर्क वाढवण्यासाठी कॅथरीनने इराणी अधिकाऱ्यांच्या बायकांचा सहारा घेतला. तुम्हाला ही कहाणी फिल्मी वाटेल. पण ही गोष्ट फक्त एखाद्या मोसादच्या गर्लची नाहीये. तर अशा शेकडो ललना मोसादच्या लेडी ब्रिगेडमध्ये आहेत. या ललना पुरुष एजंटपेक्षा झपाट्याने मिशन पूर्ण करतात. कॅथरीननेही तेच केलं.
