AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गलवान संघर्षात मृत चीनी सैनिकांच्या पुतळ्यास बिलगून रडल्या माता, मदर्स डेवर चीनचा व्हिडिओ

चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षात आपले सैनिक मारले गेल्याचे सहज स्वीकारलेले नाही. मात्र, या संघर्षाच्या सहा वर्षांनंतर चीनच्या सरकारी मीडियाने एक व्हिडीओ जारी केला आहे.

गलवान संघर्षात मृत चीनी सैनिकांच्या पुतळ्यास बिलगून रडल्या माता, मदर्स डेवर चीनचा व्हिडिओ
china video
| Updated on: May 11, 2026 | 6:27 PM
Share

‘मदर्स डे’ निमित्ताने चीनने गलवान खोऱ्यातील संघर्षाला उजाळा दिला आहे. या निमित्ताने चीनने एक व्हिडीओ जारी केला आहे. ज्यात अर्धे सत्य आणि अर्धे खोटे आहे. चीनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सच्या वतीने जारी केलेल्या व्हिडीओत १५ जून २०२० रोजी गलवान खोऱ्यात मारल्या गेलेल्या तीन चीनी सैनिकांच्या माता बीजिंगच्या आर्मी म्युझियममध्ये आपल्या मुलांना श्रद्धांजली करण्यासाठी पोहचलेल्या दाखवल्या आहेत. या व्हिडीओत तीन महिला माता आणि आपल्या मुलांच्या (चीनी सैनिक) पुतळ्यांना बिलगून रडताना दिसत आहेत.

ग्लोबल टाईम्सने लिहीले आहे की,’मदर्स डेच्या एक दिवस आधी जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या चेन जियांगरोंग, शियाओ सियुआन आणि वांग झूओरान यांच्या मातांनी चीनी पिपुल्स रेव्हॉल्युशनच्या मिलिट्री म्युझियमचा दौरा केला, जेथे त्यांनी त्यांच्या मुलांच्या पुतळ्यांना बिलगून त्या रडल्या आणि तेथे त्यांची आठवण येत असल्याचे संदेश लिहिले आहेत.

१५ जून २०२० रोजीच्या रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांत हिंसक झडप झाली होती. हा संघर्ष वास्तविक संघर्ष नियंत्रण रेषेवर(LAC) तणाव वाढल्यानंतर झाला होता. दोन्ही देशांदरम्यान आधी सहमती बनली होती काही भागातील सैनिकांना मागे घ्यायचे. मात्र, भारतीय सैन्याला चीनकडून LAC वर काही बांधकाम आणि चीनी सैन्यांची तैनातीत बदल दिसला.

त्यानंतर भारतच्या वतीने कर्नल बी संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिक चर्चेसाठी चीनी चौक्यांजवळ पोहचले. त्यावेळी चीनने विश्वासघात केला. तेव्हा दोन्ही पक्षांकडून संघर्ष सुरु झाला. चीनी सैनिकांनी योजनापूर्वक दगड, लोखंडी रॉड आणि काटेरी बांबूंचा वापर करुन तासभर हिंसक झडप झाली.

भारताने चीनकडून अचानक झालेल्या या हल्ल्याचे चोख उत्तर दिले. या हिंसक झडपेत भारताच्या २० सैनिकांना बलिदान द्यावे लागले. बातम्यांनुसार या चकमकीत चीनचे ४० हून जास्त सैनिक मारले गेले. मात्र, चीनने हे अधिकृतपणे स्वीकार केले नाही. खूप दिवसानंतर चीने त्यांचे ४ सैनिक यात मारले गेल्याचा दुजारो दिला. मात्र, वास्तविक संख्येबाबत दीर्घकाळापासून वाद आहे. हा ४५ वर्षांतील भारत – चीन सीमेवर सर्वात घातक सैन्य संघर्ष मानला गेला आहे.

येथे व्हिडीओ पाहा –

पाच वर्षांनंतर चीनचा प्रोपगँडा

आता गलवान संघर्षाला पाच वर्षे झाल्यानंतर चीन या मुद्द्याला पुन्हा बाहेर काढले आहे. आणि श्रद्धांजलीचा व्हिडीओ ग्लोबल टाईम्सच्या एक्स अकाऊंटवर इंग्रजीत पोस्ट केला आहे. या व्हिडीओत चीन गलवान संघर्ष मरणाऱ्या सैनिकांची संख्या तीन सांगितली जात आहे. तीन महिला मदर्स डेच्या एक दिवस आधीच बिजींग येथील सैन्य संग्रहालयात जाऊन या तीन सैनिकांच्या पुतळ्याला बिलगून रडत आहेत.

Follow Us
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल...
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यानं सांगितलं मोठं गुपित
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआधीच...मोठी अपडेट समोर!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा! 1 एप्रिल 2021 पासून...
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं
वरीष्ठांकडून दखल; शिंदे- फडवीसांची चर्चा अन्... संजय दीना पाटलांचं विधान वादाच्या भोवऱ्यात, काय निर्णय घेणार?
संजय पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार
Shivsena | संजय दिना पाटील यांच्या त्या वक्तव्यांवरून ठाकरे गट आक्रमक; पोलिसांत तक्रार दाखल
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या
आता सगळंच समोर आलं... लोहगडावर जाण्यापूर्वी... आरोपी सिया आणि चेतनच्या कॅफेतील CCTVतून हादरवणार खुलासे
बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव
मोठी बातमी! बदलापूरमध्ये पत्नीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघड; हार्ट अटॅकचा बनाव फसला, पती आणि सासू अटकेत
सत्ता डोक्यात गेलीय! संजय पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात
Sushma Andhare | सत्ता डोक्यात गेलीय! संजय दिना पाटलांवर सुषमा अंधारेंचा घणाघात; फडणवीसांनाही केला थेट सवाल
दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10
Venezuela | दोन शक्तिशाली भूकंपांनी व्हेनेझुएलात हाहाकार; मृतांचा आकडा 10 हजारांच्या पार जाण्याची भीती!