AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलचे विरोधात मुस्लीम देश एकत्र, तिकडे नेतन्याहू यांचा ट्रम्प यांना फोन

इस्रायलच्या विरोधात सर्व मुस्लीम देश पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. सौदी अरेबियात मुस्लीम देशांचे नेते यायला सुरुवात झाली आहे. पण यादरम्यान इस्रायलच्या पंतप्रधानांनी अमेरिकेचे होणारे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन केला आहे. एका आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये तीनवेळा चर्चा झाल्याचं बोललं जातंय.

इस्रायलचे विरोधात मुस्लीम देश एकत्र, तिकडे नेतन्याहू यांचा ट्रम्प यांना फोन
| Updated on: Nov 11, 2024 | 8:16 PM
Share

Netanyahu Call Trump : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयाने इस्रायली लोकं आनंदी आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू देखील यामुळे खूप उत्साहित आहेत. आठवडाभरात नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी तीन वेळा फोनवर चर्चा केलीये. ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेत ते इराणच्या धोक्याबद्दल एकमत आहेत. दुसरीकडे अरब आणि मुस्लीम देश पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. यासाठी ते सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये एकत्र येत आहेत. गाझा आणि लेबनॉनमधील इस्रायलच्या कारवाई विरोधात इतर मुस्लीम देश आक्रमक झाले आहे. पॅलेस्टिनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास हे देखील सौदी अरेबियात पोहोचले आहेत.

या परिषदेत इस्रायलच्या कारवाईचा निषेध केला जाणार आहे. यासोबतच युद्ध थांबवण्यासाठी आणि या भागात लोकांना मदत पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जाणार आहे. पॅलेस्टाईन आणि लेबनॉनला मदत करण्यासाठी हे देश एकत्र येत आहेत. याशिवाय ते इस्रायलवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. एकीकडे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत पुन्हा सत्तेत येत आहेत तर दुसरीकडे जरी सौदी अरेबिया इतर मुस्लीम देशांना एकत्र करत आहे. स्वतंत्र पॅलेस्टाईनची सौदी अरेबियाची मागणी आहे. तर गाझामधील संकट वाढत असताना पॅलेस्टाईनबाबत सौदी अरेबियावर दबावही वाढत होता.

गाझामध्ये त्वरित युद्धविराम, नागरिकांचे संरक्षण आणि गाझामधील अत्यावश्यक सेवा याबाबत चर्चा करुन ठराव मांडला जाणार आहे. इस्रायवलच्या विरोधात इतर देशांना एकत्र करण्याचं काम यामाध्यमातून होणार आहे. अमेरिका ही इस्रायलच्या बाजुने उभी राहते. त्यातच आता अमेरिकेत नवीन सरकार सत्तेत येत असल्याने नेतन्याहू यांना आशा आहे की राष्ट्राध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प हे इस्रायला आणखी मजबूत करतील. इस्रायलचे पंतप्रधान आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात आठवडाभरात तीन वेळा फोनवर चर्चा झालीये. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इस्रायलला भक्कम पाठिंबा दिला होता. आंतरराष्ट्रीय दबावाच्या विरोधात जाऊन ट्रम्प यांनी हे काम केले होते.

ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळात UAE, बहरीन, मोरोक्को आणि सुदान यांच्यासोबत इस्रायलचा करार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या कराराद्वारे या अरब देशांनी इस्रायलशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी सौदी अरेबिया या करारात सामील झाला नव्हता, परंतु संरक्षण आणि आर्थिक फायद्यांच्या बदल्यात इस्रायल आणि सौदी यांच्यात करार करण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.