AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमलेच नाही, थेट भारतीय लष्कराने जहाजाला..

India LPG Tanker: इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. हे युद्ध थांबवले पाहिजे, अशी जगाची इच्छा आहे. मात्र, परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे. भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला करता आले नाही.

भारताने जे केले ते जगातील एकाही देशाला जमलेच नाही, थेट भारतीय लष्कराने जहाजाला..
India
| Updated on: May 14, 2026 | 8:54 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाची भारताला मोठी झळ बसत आहे. एलपीजीचा तुटवडा आहे. यासोबतच केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. यादरम्यानच भारतासाठी अत्यंत दिलासादायक बातमी पुढे आली. होर्मुज खाडीतून भारताच्या एलपीजी गॅस टँकरने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. होर्मुज खाडीतील सध्याच्या परिस्थितीत भारतीय जहाज होर्मुज खाडी पार करून निघाले हा अत्यंत मोठा विजय म्हणावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून होर्मुज खाडी पूर्ण ठप्प आहे. एमव्ही सनशाईन या एलपीजी टँकरने होर्मुज खाडी पार केली. विशेष म्हणजे या जहाजाला भारतीय नौदल आणि इतर काही यंत्रणा सुरक्षा पुरवत आहेत. अत्यंत सुरक्षेत जहाज भारतात आणले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अत्यंत संवेदनशील असलेल्या भागातून हे एलपीजी जहाज निघाले.

एएनआयच्या वृत्तानुसार, एमव्ही सनशाईनने बुधवारी रात्री 13 मे 2026 रोजी होर्मुज खाडी पार केली. त्यानंतर हे जहाज फारस खाडी ओलांडून भारताच्या दिशेने निघाले आहे. भारतीय नाैदलाने या जहाजाला संरक्षण दिले. एक कवच तयार करून जहाजाला भारताच्या दिशेने आणले जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती दिली.

होर्मुज खाडी सुरक्षित पार करून भारताच्या दिशेने निघालेल्या या जहाजामध्ये नक्की किती एलपीजी आहे, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाहीये. मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडून सांगण्यात आले की, भारत सध्याची ऊर्जा पुरवठ्याची परिस्थिती व्यवस्थित हाताळत आहे. मात्र, या जहाजामध्ये नक्की किती एलपीजी गॅस आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

काही दिवसांपूर्वीच होर्मुज खाडीत भारतीय जहाजावर मोठा हल्ला झाला. थेट गोळीबार करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच थेट होर्मुज खाडीत एका भारतीय जहाजाला बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यादरम्यानच आता सुरक्षित होर्मुज खाडी भारतीय जहाजाने पार केली. होर्मुज खाडीत अजूनही भारतीय जहाज अडकली आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून सतत प्रयत्न केली जात आहेत.

Follow Us
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...