US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ

| Updated on: Jan 14, 2021 | 1:15 PM

बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान वॉशिंग्टनमध्ये 20 हजार नॅशनल गार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहेत.

US Capitol | संसदेचं रुपांतर छावणीत, 20 हजार जवान तैनात, जवानांवर जमिनीवर झोपण्याची वेळ
Follow us on

वॉशिंग्टन : आठवड्याभरापूर्वी अमेरिकेच्या संसदेत (US Capitol) झालेल्या हिंसेनंतर 20 जानेवारीला (National Guard Troops Sleeping On Floor) निवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden Inauguration) यांचा शपथविधी सोहळा मोठ्या सुरक्षेत पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान कॅपिटॉलवर पुन्हा एकदा हल्ला होण्याची शक्यता आहे. तसेच, यावेळी आयई़डी सारख्या स्फोटकांचा हल्ला आंदोलक करु शकतात, म्हणून नॅशनल गार्डला सतर्क हकरण्यात आलं आहे. कॅपिटॉलवर झालेल्या हल्ल्यादरम्यान पाईप बॉम्ब आढळून करण्यात आले होते (National Guard Troops Sleeping On Floor).

अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी गेल्या 6 जानेवारीला संसदेच्या इमारतीवर हल्ला चढवला. या हिंसेत पाच जणांचा मृत्यू झाला होता.

बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान वॉशिंग्टनमध्ये 20 हजार नॅशनल गार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहेत. पहिले डीसीमध्ये 6200 जवान तैनात आहेत आणि शनिवारपर्यंत 10 हजार अधिक जवान तैनात करण्यात आले आहे. पहिले जवानांना फक्त सुरक्षा उपकरणं घेवून जाण्याची परवानगी होती. मात्र, आता त्यांच्याजवळ हँडगन आणि रायफल देखील असेल.

तणावपूर्ण परिस्थितीतील कॅपिटॉल इमारतीच्या आत नॅशनल गार्डचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये शेकडो जवान हे त्यांच्या सामानासोबत लादीवर झोपलेले दिसत आहेत. हे फोटो पाहून लोकांनी आक्रोश व्यक्त केला आहे.

नॅशनल गार्डच्या जवानांशिवाय आठ फुट ऊंच स्टीलचे कठडे बनवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, वॉशिंग्टन आणि सर्व 50 राज्यांच्या राजधानीत 20 जानेवारीपर्यंत हल्ले होण्याची शक्यता आहे. एकट्या कॅपिटॉलमध्ये तीन हल्ले होण्याचा प्लान आहे, अशी चेतावणी FBI ने दिली आहे.

सिक्यॉरिटी एक्सपर्ट्सनुसार, कट्टरपंथी आणि ट्रम्प समर्थकांनी सोशल मीडियावर डीसीमधील हिंसेची धमकी दिली आहे. गेल्या काही काळात अशी प्रकरणं वाढली आहेत (National Guard Troops Sleeping On Floor).

सिक्रेट सर्व्हिसने आता या सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी घेतली आहे आणि शहरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. अनेक ठिकाणी प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. तसेच, बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. बुधवारी रिपब्लिकन नेते माइक वॉल्ट्ज आणि विकी हार्ट्जलरने सैनिकांना पिझ्झा वाटले.

गृहयुद्धानंतर प्रथमच जवानांनी कॅपिटॉलमध्ये तळ ठोकला आहे. प्रवक्ते नँसी पेलोसी यांनी इमारतीच्या बाहेर जवानांचे आभार मानले. यानंतर दुसऱ्यांदा ट्रम्प यांच्या महाभियोगचा प्रस्तावावर चर्चा झाली त्यानंतर त्याला मंजुरी मिळाली.

National Guard Troops Sleeping On Floor

संबंधित बातम्या :

Donald Trump | पडत्या काळात स्वकियांनीही साथ सोडली!, 10 रिपब्लिकन खासदारांकडूनही ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन

Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर

डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी

ट्रम्पचा सद्दाम हुसैन होणार की गद्दाफी?; राष्ट्रपती असतानाच फरार होण्याचा प्रयत्न?