AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी

चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. (YouTube Suspends Trump Channel Temporarily )

डोनाल्ड ट्रम्प यांना युट्यूबचा दणका; 7 दिवसांसाठी घातली बंदी
डोनाल्ड ट्रम्प
| Updated on: Jan 13, 2021 | 12:42 PM
Share

वॉशिंग्टन: चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अमेरिकेचे मावळते राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. युट्यूबने ट्रम्प यांच्यावर सात दिवसांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सात दिवस युट्यूबवर एकही व्हिडीओ अपलोड करता येणार नाही. या आधी ट्विटरने ट्रम्प यांच्यावर बंदी घातली होती. (YouTube Suspends Trump Channel Temporarily )

केवळ ट्रम्प यांना सात दिवस बंदी घालून युट्यूब थांबलेलं नाही तर ट्रम्प यांचा एक व्हिडीही युट्यूबवरून काढून टाकण्यात आला आहे. हिंसेच्याविरोधातील धोरणाचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं युट्यूबने स्पष्ट केलं आहे. हिंसा भडकण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही ट्रम्प यांचा नवा व्हिडीओ युट्यूबवरून काढून टाकत आहोत. कारण त्यांनी आमच्या धोरणांचं उल्लंघन केलं आहे, असं युट्यूबने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांना सात दिवस युट्यूबवर कोणतेही व्हिडीओ अपलोड करता येणार नाही. त्याआधी फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामनेही ट्रम्प यांचं अकाऊंट सस्पेंड केलं होतं.

अमेरिकेच्या संसद परिसरात हल्ला झाला होता. यावेळी एका पोलिसासहित पाच लोकांचा मृत्यू झाला होता. ज्या दिवशी जो बायडेन यांना राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्याचं प्रमाणपत्रं देण्याबाबतच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ही हिंसा झाली. हे सर्व लोक ट्रम्प समर्थक असल्याचं बोललं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचं अकाऊंट बंद केल्यानंतर ट्विटरने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट्सची आम्ही समीक्षा केली. त्यांच्या ट्विट्समुळे अमेरिकेत दंगे भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचे अकाऊंट बंद करण्याचा निर्णय घेतला असे ट्विटरने सांगितले आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल त्यांना अमान्य आहे. तेव्हापासून ते गुरुवारी अमेरिकन संसदेवर हल्ला झाल्यानंतरसुद्धा डोनाल्ड ट्रम्प चिथावणीखोर ट्विट करत होते. फेसबुकच्या माध्यमातूनसुद्धा ते अमेरिकन जनतेला भडकवत असल्याचा आरोप होतोय.

बायडेन यांच्या शपथविधीपर्यंत प्रतिबंध

जो बायडन यांचा शपथविधी येत्या 20 जानेवारी रोजी होणार आहे. म्हणजे हा शपथविधी सोहळा पार पडेपर्यंत ट्रम्प यांच्यावर युट्यूबची बंदी असणार आहे. शपथविधी सोहळ्यादरम्यान काहीही गडबड होऊ नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. (YouTube Suspends Trump Channel Temporarily )

संबंधित बातम्या:

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी मैत्री राखली, जाता-जाता पाकिस्तानसह तुर्कीला मोठा झटका!

जेव्हा अमेरिकेच्या अध्यक्षाचं ट्विटही हटवलं जातं..

(YouTube Suspends Trump Channel Temporarily )

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.