AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी

अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली.

US Violence: आधी समर्थकांचा धुडगुस, अखेर ट्रम्प यांची खुर्ची सोडण्याची तयारी
| Updated on: Jan 07, 2021 | 4:05 PM
Share

वॉशिंग्टन : अमेरिकेची संसद काँग्रेसने इलेक्टोरल कॉलेजच्या निकालाला गृहित धरत डेमॉक्रेटिक पक्षाचे जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे आता सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष पद सोडण्यास नकार देणारे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अखेर खुर्ची खाली करण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान याआधी आज (7 जानेवारी) अमेरिकेची संसद कॅपिटल हिल भवनमध्ये (US Capitol Violence) ट्रम्प समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि तोडफोड केल्याचाही प्रकार घडला (Donald Trump ready to leave Government after Parliament Congress decision and Capitol violence).

या हिंसाचाराचे अनेक फोटो समोर आले आहेत. यात ट्रम्प समर्थक तोडफोड करत संसद परिसरात हिंसाचार करत असल्याचं दिसत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक निकाल जाहीर होण्याआधीच निवडणुकीत घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांना याबाबत एकही पुरावा देता आला नाही. न्यायालयात आव्हान देण्यात येणारे बहुतांश खटले ट्रम्प हरले आहेत. मात्र, यानंतरही आज (7 जानेवारी) ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना निवडणूक निकाल अमान्य करण्यास सांगितलंय.

नियमांप्रमाणे सत्तेचं हस्तांतरण होईल : डोनाल्ड ट्रम्प

बायडन यांच्या विजयावर अमेरिकेच्या संसदेने शिक्कामोर्तब केल्यानंतर ट्रम्प म्हणाले, “मी निवडणुकीच्या निकालाशी सहमत नाही. मात्र, तरीही 20 जानेवारीला नियमांनुसार मी सत्तेचं हस्तांतरण करेल. केवळ वैध मतं मोजावीत यासाठी आमचा लढा असाच सुरु राहिल. माझा पहिला कार्यकाळ अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याच्या लढाईची केवळ सुरुवात आहे.”

ट्रम्प समर्थकांच्या हिंसाचारानंतर अनेक राजीनामे

  • स्टिफनी ग्रिम्स : मेलानिया ट्रम्प यांच्या सहकारी
  • सारा मॅथ्यू : डेप्युटी प्रेस सेक्रेटरी, व्हाईट हाउस
  • रिकी निकेटा : सोशल सेक्रेटरी, व्हाईट हाउस

20 जानेवारी रोजी बायडन यांचा शपथविधी

अमेरिकेच्या संसदेत राष्ट्राध्यक्ष कोण यावर अंतिम निर्णय झाल्याने आता अमेरिकेचे पुढील अध्यक्ष यावरील गोंधळ संपला आहे. आता जो बायडन 20 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतील. बायडन यांना 306 इलेक्टोरल मतं मिळालेली आहेत. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांना 232 इलेक्टोरल मतं मिळाली.

संबंधित बातम्या :

US Capitol | ट्रम्प समर्थकांचा कॅपिटल भवनाबाहेर राडा, गोळीबारात महिलेचा मृत्यू, वॉशिंग्टनमध्ये कर्फ्यू

अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा

Attack on Capitol Hill | ट्रम्प यांचा आडमुठेपणा की राजद्रोह, अमेरिका का धुमसतेय? सगळा घटनाक्रम!

स्पेशल रिपोर्ट: अमेरिका यादवी युद्धाच्या उंबरठ्यावर आहे का?

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू

Donald Trump ready to leave Government after Parliament Congress decision and Capitol violence

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.