AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी मैत्री राखली, जाता-जाता पाकिस्तानसह तुर्कीला मोठा झटका!

ट्रम्प प्रशासनाने 'नाटो'मध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयम एर्डोगान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी मैत्री राखली, जाता-जाता पाकिस्तानसह तुर्कीला मोठा झटका!
| Updated on: Dec 17, 2020 | 12:59 PM
Share

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. मात्र जाता-जाता ट्रम्प प्रशासनानं घेतलेल्या एका निर्णयामुळं त्यांनी भारताशी असलेली मैत्री तर राखलीच, सोबतच पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा झटका दिला आहे. ट्रम्प प्रशासनाने ‘नाटो’मध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयम एर्डोगान यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Turkey banned by US President Donald Trump)

अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे तुर्कीच्या अधिकारांवर करण्यात आलेला हल्लाच आहे, अशा शब्दात सेरेप तैयम एर्डोगान यांनी अमेरिकेच्या निर्णयावर टीका केली आहे. दरम्यान तुर्की हा सध्या असा एकमेव देश आहे जो पाकिस्तानशी जास्त जवळीक साधून आहे.

अमेरिकेत तुर्कीवर प्रतिबंध का?

अमेरिकेने सोमवारी तुर्कीच्या डिफेन्स इंडस्ट्री डायरोक्ट्रेट (SSB) आणि या कंपनीचे प्रमुख इस्माइल देमिर यांच्यावर प्रतिबंध लगावला आहे. त्याचबरोबर कंपनीच्या अन्य तीन कर्मचाऱ्यांवरही बंदी घातली आहे. रशियाच्या S-400 मिसाईल सिस्टिमच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तुर्की हा देश ‘नाटो’चा एक भाग आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं केलेली कारवाई अधिक चर्चेचा विषय ठरत आहे. यापूर्वी एप्रिल 2014 मध्ये रशिया आणि यूक्रेनमध्ये युद्ध सुरु होतं. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांमनी रशिया आणि यूक्रेनवर बंद घातली होती. त्यावेळी ओबामा यांनी इंटरनॅशनल इमर्जन्सी इकॉनॉमिक पॉवर अॅक्ट आणि नॅशनल इमर्जन्सी अॅक्टचा वापर केला होता. इतकच नाही तर रशियासोबत मैत्री असलेले आणि त्यांच्याकडून शस्त्रास्त्र खरेदी करणाऱ्या भारतासह अन्य देशांनाही ओबामा यांनी सूचित केलं होतं.

भारताविरोधात अद्याप कुठलीही कारवाई नाही

भारतानं रशियाकडून आतापर्यंत अनेकदा शस्त्रास्त्रांची खरेदी केली आहे. 2018 मध्येही भारतानं रशियाकडून 5 S-400 मिसाईलविरोधी यंत्रणेचा करार केला होता. अमेरिकेच्या विरोधानंतर भारितानं हा करार केला होता. अमेरिकेकडूनही भारताला वारंवार इशारा देण्यात आला आहे. इतकच नाही तर भारताला तुर्कीप्रमाणे प्रतिबंध लावण्याचा इशारा दिला गेला आहे. पण भारतावर अद्याप अशी कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. तर अमेरिकेकडूनही भारतानं अनेकदा शस्त्रास्त्र खरेदी केली आहे.

तुर्कीवर कारवाई, मग भारताची मदत कशी?

तुर्की हा पाकिस्तानशी सर्वात जवळीक साधून असलेला देश आहे. काश्मीरमधील दहशतवाद म्हणजे अधिकारांची लढाई असल्याचं विधान तुर्कीनं केलं आहे. इतकच नाही तर तुर्कीच्या राष्ट्रपतींकडून अनेकदा काश्मीरमध्ये जनमत घेण्याची मागणी करण्यात आली आहे. भारताकडून अनेकदा तुर्कीला आमच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष न घालण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान’ चीनच्या ताब्यात जाणार का?

अमेरिकेत अध्यक्षांच्या निवडणुकीचा निकाल नोव्हेंबरमध्ये, शपथविधी 20 जानेवारीला, काय परंपरा?

Turkey banned by US President Donald Trump

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.