Donald Trump | पडत्या काळात स्वकियांनीही साथ सोडली!, 10 रिपब्लिकन खासदारांकडूनही ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन

ट्रम्प यांच्याविरोधातील प्रस्तावाचं समर्थन 222 डेमोक्रॅटिक्सनी तर केलं आहेच. सोबतच रिपब्लिकन पक्षाच्या 10 आमदारांनीही महाभियोग प्रस्तावाला समर्थन दिलं आहे.

Donald Trump | पडत्या काळात स्वकियांनीही साथ सोडली!, 10 रिपब्लिकन खासदारांकडूनही ट्रम्प विरोधातील महाभियोगाचं समर्थन

नवी दिल्ली: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पडत्या काळात मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. ट्रम्प हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, ज्यांच्याविरोधात एकाच कार्याकाळात 2 वेळा महाभिगोय प्रस्ताव आणण्यात आला. इतकंच नाही तर त्यांच्या समर्थक खासदारांनीही त्यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्तावाचं समर्थन केलं आहे. (The impeachment motion against Donald Trump is also supported by 10 Republican’s)

अमेरिकी संसदेवर हल्ला करण्यासाठी आपल्या समर्थकांना उकसवल्याचा आरोप डेमोक्र्ॅट्सकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर करण्यात आला आहे. अमेरिकी संसदेवर ट्रम्प समर्थकांनी केलेल्या हल्ल्यात 5 लोकांचा जीव गेलाय. त्यामुळे अमेरिकेच्या इतिहासात तो दिवस काळा दिवस ठरला आहे. ट्रम्प यांच्याविरोधातील प्रस्तावाचं समर्थन 222 डेमोक्रॅटिक्सनी तर केलं आहेच. सोबतच रिपब्लिकन पक्षाच्या 10 आमदारांनीही महाभियोग प्रस्तावाला समर्थन दिलं आहे.

महाभियोगासाठी एकूण 218 मतांची आवश्यकता असते. पण ट्रम्प यांच्याविरोधात आणि महाभियोग प्रस्तावाच्या समर्थनात एकूण 232 मतं पडली. तर महाभियोग प्रस्तावाला विरोध करण्यासाठी 197 मतदारांनी मतदान केलं.

कोणत्या 10 रिपब्लिकन खासदारांकडून महाभियोगाचं समर्थन

1. लिज चेनी (WV) 2. एन्थोनी गोंजालेज (OH) 3. जेमी हेरेरा बेउटलर (WA) 4. जॉन काटको (NY) 5. एडम किंजिगर (IL) 6. पीटर मीजर (MI) 7. डॅन न्यूहाऊस (WA) 8. टॉम राइस (SC) 9. फ्रेड अप्टन (MI) 10.डेविड बलदो (CA)

आतापर्यंत कोणत्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध महाभियोग

अमेरिकेत ट्रम्प यांच्यापूर्वीही काही राष्ट्राध्यक्षांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र, ट्रम्प हे असे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत, ज्यांच्याविरुद्ध एकाच कार्यकाळात 2 वेळा महाभियोग प्रस्ताव आणला गेलाय.

एन्ड्र्यू जॉन्सन बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प डोनाल्ट्र टम्प

अमेरिकेतील महाभियोगाची प्रक्रिया काय असते?

गंभीर गुन्ह्यांबद्दल महाभियोग

अमेरिकन घटनेच्या आर्टिकल II, सेक्शन 4 नुसार महाभियोगाची प्रक्रिया केली जाते. राष्ट्रद्रोह, चिथावणी देऊन देशांतर्गत सशस्त्र उठाव घडवून आणणे, लाच आणि इतर गंभीर गुन्ह्याप्रकरणी अमेरिकन राष्ट्रपतीला महाभियोगाचा सामना करावा लागतो. महाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारल्यानंतर ही कारवाई केली जाते.

कनिष्ठ सभागृहातून प्रक्रिया

अमेरिकेत राष्ट्रपतीविरोधात महाभियोग चालवण्यासाठी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह (कनिष्ठ सभागृहात) प्रस्ताव ठेवावा लागतो. कनिष्ठ सभागृहात या प्रस्तावावर चर्चा होते. त्यानंतर मतदान घेऊन प्रस्ताव मंजूर केला जातो. त्यानंतर हा प्रस्ताव सीनेटकडे पाठवला जातो. सीनेटमध्ये त्यावर एक सुनावणी होते. सीनेटमध्येही महाभियोग प्रस्तावावर मतदान होतं. मात्र, एक तृतीयांश बहुमत असेल तरच त्याला मंजुरी मिळते.

संबंधित बातम्या:

Trump Impeachment Updates: डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कारवाई; प्रस्ताव बहुमताने मंजूर

कशी होते अमेरिकेच्या राष्ट्रपतींवर महाभियोगाची कारवाई?; ट्रम्प यांची हकालपट्टी होणार?

The impeachment motion against Donald Trump is also supported by 10 Republican’s

Published On - 7:20 am, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI