AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nepal Flash Flood: जिवंत नसेल, तर किमान मृतदेह तरी…, नेपाळमध्ये लोकांची दयनीय अवस्था, शवगृहाबाहेर लांबच लांब रांगा

Nepal Flash Flood: कोणाचा नवरा, तर कोणचा बाप... आपल्या माणसांच्या शोधात काय घेऊन फिरत आहेत नातेवाईक, शवघरबाहेर लांबच लांब रांगा..., तेथील परिस्थिती मन सुन्न करणारी..

Nepal Flash Flood: जिवंत नसेल, तर किमान मृतदेह तरी..., नेपाळमध्ये लोकांची दयनीय अवस्था, शवगृहाबाहेर लांबच लांब रांगा
Nepal Flash Flood
| Updated on: Aug 31, 2026 | 12:43 PM
Share

Nepal Flash Flood: नेपाळवर एक मोठं संकट आलं आणि होत्याचं नव्हतं करुन गेलं… यामध्ये कित्येक बेपत्ता आहेत, तर अनेकांचा मृत्यू झालाय. पण नातेवाईकांना आपला माणून जिवंत आहे की, त्याचा मृत्यू झाला आहे… काहीही माहिती नाही. काठमांडू येथील त्रिभुवन विश्वाविद्यालय शिक्षण रुग्णालयाच्या बाहेर उभ्या असलेल्या महिलेने तेथील पत्रकारांना एक प्रश्न विचारला, जो मन सुन्न करणारा होता… ‘तुमचे कॅमेरे आमच्या लोकांना परत आणू शकतील का?’ महिलाच्या या प्रश्नानंतर तेथील वातावरण काही वेळासाठी गंभीर झालं. त्यांच्या हातात बेपत्ता नातेवाईकांचे फोटो आहे आणि डोळ्यात परतण्याच्या आशा आहे… तेथील लोक आता म्हणत आहेत ती, आशे शिवाय आता बाकी काहीच उरलेलं नाही.

‘नेपाळी टाईम्स’च्या रिपोर्टनुसार, दिल कुमारी मसरांगी मगर रुग्णालाच्या गेटवर तिचा बेपत्ता मेहुणा आणि भांच्याचे फोटो लावत आहे… तिच्या भोवती मृतांचे फोटो आणि आतापर्यंत बेपत्ता झालेल्या लोकांची मोठी यादी आहे. महिला पत्रकारांना तिची स्थिती सांगत आहे.

महिला म्हणते, ‘आशा आणि प्रतिक्षेशिवाय आता काहीही बाकी राहिलेलं नाही. जर जिवंत भेटत नसतील तर, त्यांचे मृतदेह तरी भेटावे… कमीतकमी हे तरी कळेल की, ते कुठे आहे.’ ही फक्त दिल कुमारी हिची स्थिती नाही. रुग्णालयाच्या बाहेर आपल्या माणसांच्या शोधात नातेवाईकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. कोणी फोटो घेऊन पोहोचले आहेत, तर कोणी कोणता पुरावा घेऊल रुग्णालयाच्या बाहेर आहे… कोणी भावाच्या, तर कोणी बहिणीच्या, नवऱ्याच्या, वडिलांच्या, आईच्या शोधात आहेत.

धक्कादायक सत्य म्हणजे, अनेक कुटुंबियांचं शोधकार्य फक्त एका रुग्णालयापर्यंत मर्यादित राहिलेलं नाही. सोनिया केसी नावाची महिला, भाऊ शिवराम याच्या शोधात तीन दिवसांपासून काठमांडू येथील वेगवेगळ्या रुग्णालयात पोहोचत आहे. तर चितवन येथे राहण्याऱ्या लोकांना नातेवाईकांचा शोध नारायणी नदीकिनारी घेण्यास सांगितलं आहे… सोनिया म्हणते, जोपर्यंत भाऊ भेटत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रतिक्षेत राहिल.. सांगायचं झालं, सोशल मीडियावर देखील घटनेचे  अनेक  फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा