AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेपाळमध्ये पुन्हा मोठे संकट, पूल गेले वाहून, गावांमध्ये शिरले पाणी, अचानक पूर..

नेपाळमध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा पूर आला. या पुराने थैमान घातला. त्यातच आता पुन्हा नेपाळमध्ये पूर आलाय. काही गावांमध्ये पाणी शिरल्याची माहिती मिळतंय. पुन्हा एकदा नेपाळमध्ये स्थिती धोकादायक असल्याचे बघायला मिळतंय.

नेपाळमध्ये पुन्हा मोठे संकट, पूल गेले वाहून, गावांमध्ये शिरले पाणी, अचानक पूर..
Nepal flood
| Updated on: Oct 11, 2026 | 10:40 AM
Share

नेपाळमध्ये विनाशकारी महापूराने मृतांचा आकडा 1000 च्या घरात पोहचला. बचावकार्य थांबले आहे पण अजूनही अनेक लोक बेपत्ता आहे. हादरवणारी अनेक व्हिडीओ नेपाळमधून पुढे आली, ज्याने एकच धक्का सर्वांना बसला. नेपाळच्या या कठीण काळात भारत नेपाळच्या मदतीला धावून गेला. नेपाळचे पंतप्रधान मागील काही महिने भारताबद्दल धक्कादायक विधाने करताना दिसले. मात्र, असे असले तरीही भारत नेपाळच्या मदतीला धावून गेला. भारताने तातडीने खाद्यान्न, औषधी आणि इतर अत्यावश्यक साहित्याचा मोठा पुरवठा केला आहे. तंत्रज्ञांचे पथकही मदत कार्यात सहभागी झाले. मात्र, आम्हाला भीक नको, उलट जागतिक समुदायाने नुकसान भरपाई द्यावी अशी अजब मागणी नेपाळने केली होती. अनेक देश नेपाळच्या मदतीला धावले होते.

नेपाळमध्ये पुराने थैमान घातले, हजारो लोकांचा जीव गेला. हे ताजे असतानाच आता पुन्हा एकदा नेपाळमध्ये स्थिती धक्कादायक आहे. नेपाळमधील बुढी गंडकी नदीला अचानक आलेल्या भीषण पुरामुळे गोरखा जिल्ह्यात 3 पूल वाहून गेले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. पुन्हा एकदा पूर थैमान घालताना दिसतोय. पाण्याचा मोठा प्रवाह बघायला मिळतोय.

अनेक रस्ते खचले आहेत आणि अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नदीकाठच्या नागरिकांना त्रिशूली दोभान पर्यंत नदीच्या जवळ न जाण्याचा आणि सुरक्षित तसेच उंचावरील ठिकाणी राहण्याचा इशारा दिला आहे. आपत्ती व्यवस्थापन पथके स्थानिक लोकांच्या मदतीसाठी आणि बचावासाठी युद्धपातळीवर काम करत आहेत.

नेपाळमध्ये 11 ऑक्टोबर 2026 रोजी गोरखा जिल्ह्यातील चुमनुब्री गावात सुक्या दरडी कोसळून बुढी गंडकी नदीचा प्रवाह अडवला गेल्याने नवीन पुराचे संकट निर्माण झाले आहे. या अडथळ्यामुळे नदीच्या खालच्या भागात अचानक पूर आला असून, अनेक घरे आणि पायाभूत सुविधा वाहून गेल्या आहेत. प्रशासनाने तातडीने आजूबाजूच्या गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश दिले आहेत. पुन्हा एकदा नेपाळमध्ये मोठा पुर आल्याचे बघायला मिळतंय. नेपाळमधील पुरावर सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे...
Ajinkya Shinde : ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याठी पुन्हा आंदोलन; दिल्लीला छावणीचे स्वरूप
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?