AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भरपाई द्या, भारत, चीन आणि अमेरिका विरोधात नेपाळची UN मध्ये धाव, थेट..

नेपाळमध्ये मोठा पूर झाला. या पुरात हजारो लोक वाहून गेली. त्यातच आता अत्यंत मोठी माहिती पुढे येत आहे. नेपाळने स्पष्ट म्हटले की, आम्हाला मदत नको, आम्हाल भरपाई द्या. यासोबतच त्यांनी भारत, चीन आणि नेपाळवर गंभीर आरोप केली.

भरपाई द्या, भारत, चीन आणि अमेरिका विरोधात नेपाळची UN मध्ये धाव, थेट..
Balen Shah
| Updated on: Sep 03, 2026 | 4:34 PM
Share

नेपाळमध्ये 26 ऑगस्ट 2026 रोजी मोठा पूर आला. या पुराने एकच थैमान घातले. या पुरात तब्बल 1204 लोकांचा जीव गेला. यासोबतच 4216 लोक बेपत्ता आहेत. काही प्रेत भारतातही वाहून आली. अजूनही लोकांचा शोध सुरू आहे. नेपाळमधील पुराच्या घटनेनंतर भारताने मोठी मदत नेपाळमध्ये पाठवली. नेपाळमध्ये मदत पाठवणारा पहिला देश भारत होता. भारतासोबतच अन्य देशांनी नेपाळला मदत केली. सुरूवातीला ज्यावेळी भारताने नेपाळला बचावकार्यात मदत करण्याचा प्रस्ताव दिला, त्यावेळी नेपाळने ती मदत नाकारली.नेपाळने मदत नाही तर भरपाई द्या अशी मागणी केली. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी रसुवामधील भोटेकोशी नदीवरील पूर हा जलवायू परिवर्तनाने झाल्याचे म्हटले. यासोबतच हिमालयी क्षेत्रातील जलवायू मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले.

सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांनी हिमालयाचे तापमान 1.8 डिग्री सेल्सिअस असल्याचे म्हटले. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही घटना बर्फ आणि पर्वताचा भाग उंचीवरून पडल्याने झाली. पंतप्रधानांनी म्हटले की, सरकारचे लक्ष शोध मोहिम, बचावकार्य आणि लोकांपर्यंत मदत पोहोचवण्यावर केंद्रीत आहे. दुसरीकडे त्यांनी जलवायूच्या संकटापासून वाचण्यासाठी मदत नाही तर भरपाई मागितली आहे.

भारत, चीनचे नाव घेत त्यांनी भरपाई मागितली. काठमांडूचा इरादा इतका जास्त पक्का आहे की, त्यांनी थेट याची भरपाई मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय मंचावर धाव घेतली. नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांनी संयुक्त राष्ट्र महासभा अर्थात (UNGA) मध्ये हे प्रकरण पाठवत आहेत. यासाठी खास योजनाही त्यांच्याकडून तयार केली जातंय. नेपाळचे विदेशमंत्री शिशिर खनाल यांनी याकरिता तीन देशांना जबाबदार धरले आहे.

त्यात भारत, चीन आणि अमेरिका यांचा समावेश आहे.  या हवामानविषयक आपत्तीचा सामना करण्यासाठी नेपाळने मदतीऐवजी नुकसानभरपाईची मागणी केली आहे. चीन, भारत आणि अमेरिका या देशांकडून ही मागणी करण्यात आली आहे, कारण हे देश हरितगृह वायूंचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या जगातील प्रमुख देशांपैकी आहेत, असे नेपाळचे म्हणणे आहे. त्यांनी रशियाकडेही मदत मागितली.

Follow Us
2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट..
Sugar Shortage : 2026-27 साठी केंद्राचा मोठा निर्णय; साखरेपासून इथेनॉल निर्मितीवर थेट...
भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
Rohit Pawar : अजित पवार गेल्यानंतर भाजपानं अर्थ खातं चोरलं; रोहित पवारांचा भाजपवर थेट निशाणा
काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
Pankaja Munde : काम केलं तर काम केलं म्हणा... पंकजा मुंडे यांचा रोख कोणाकडे?
मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...घडलं काय?
Mumbai : मुंबईच्या वडाळ्यात पादचाऱ्यावर ओला कॅबमधून झाडल्या गोळ्या...नेमकं घडलं काय?
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...