AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन प्रजातीचा साप आढळला, हवेत उडी घेऊन करतो हल्ला, वैज्ञानिकही हैराण

Flying Snakes Found : कंबोडियामध्ये विविध प्रकारच्या गुहा आहेत. अलिकडेच या गुहांमध्ये काही असे जीव सापडले आहेत, जे जगात इतर कुठेही आढळत नाहीत. यात उडणाऱ्या सापाच्या प्रजातीचा समावेश आहे.

नवीन प्रजातीचा साप आढळला, हवेत उडी घेऊन करतो हल्ला, वैज्ञानिकही हैराण
Flying Snake FoundImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Mar 29, 2026 | 4:43 PM
Share

साप पाहिला की अनेकांची झोप उडते, कारण एखाद्या विषारी सापाने चावा घेतला तर काही वेळातच मृत्यूही होऊ शकतो. अशातच आता कंबोडियामध्ये सापाची एक नवीन प्रजाती आढळली आहे. कंबोडियामध्ये विविध प्रकारच्या गुहा आहेत, या गुहांमध्ये कीटकांच्या असंख्य प्रजाती आढळतात. अलिकडेच या गुहांमध्ये काही असे जीव सापडले आहेत, जे जगात इतर कुठेही आढळत नाहीत. यामध्ये उडणारे साप, अतिशय लहान गोगलगायी आणि मिलिपीड्स यांचा समावेश आहे. याशिवाय फिरोजी (निळा आणि हिरवा) रंगाचा पिट वायपर सापही आढळला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

वैज्ञानिकांनी नोव्हेंबर 2023 ते जुलै 2025 दरम्यान कंबोडियातील 10 टेकड्यांवरील 64 गुहांमध्ये संशोधन केले. याचा अहवाल काही दिवसांपूर्वी प्रकाशित करण्यात आला होता. ब्रिटनमधील फ्लोरा अँड फॉना या संरक्षण संस्थेने कंबोडियाच्या पर्यावरण मंत्रालय आणि क्षेत्रीय तज्ज्ञांसह हा सर्वे केला. यात अनेक प्राण्याचा शोध लागला आहे. यात उडणारा सात हा एक मोठा आणि महत्त्वाचा शोध आहे. सापाची ही अशी प्रजाती आहे जी झाडांमधून जाण्यासाठी आपले शरीर सपाट करते आणि नंतर हवेत घसरत पुढे सरकते. हा साप जमिनीवर न उतरता एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी घेऊ शकतो आणि भक्ष्याची शिकार करू शकतो.

वैज्ञानिकांनी काय म्हटले?

कॅलिफोर्नियातील ला सिएरा युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ली ग्रिसमर यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘हे जैवविविधतेच्या छोट्या नमुन्यासारखे आहे, जिथे निसर्ग वारंवार स्वतःच तेच प्रयोग पुन्हा करतो. आम्ही या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्या प्रजातींच्या डीएनएचे विश्लेषण करतो आणि त्या प्रयोगाची प्रक्रिया कशी चालली आहे हे पाहतो. काही प्रजाती एकसारख्या दिसतात, तर काही वेगळ्या दिसतात. या विश्लेषणातून त्यांच्या उत्क्रांतीमागील शक्ती कोणत्या आहेत, याचा अंदाज लावता येतो.’

इतरही महत्त्वाचे शोध

कंबोडियातील या सर्वेक्षणादरम्यान या भागात सुंडा पॅंगोलिन, हिरवे मोर, लांब शेपटीचे माकड आणि नॉर्दर्न पिग-टेल्ड माकड यांसारख्या प्रजाती आढळल्या आहेत, ज्यांची संख्या जागतिक पातळीवर नगण्य आहे. ग्रिसमर यांनी सांगितले की, ‘जर आपल्याला या पृथ्वीवरील जैवविविधता जपायची असेल, तर इथे काय अस्तित्वात आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला एखादी गोष्ट अस्तित्वात आहे हेच माहीत नसेल, तर आपण तिचे संरक्षण करू शकत नाही.’

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...