AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऋषी सुनक यांची संपत्ती बघून म्हणाल हा तर कुबेर; राजे लोकांच्या श्रीमंतीलाही टाकले मागे…

ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत यशस्वी ठरलेले ऋषी सुनक हे त्यांच्या संपत्तीमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत.

ऋषी सुनक यांची संपत्ती बघून म्हणाल हा तर कुबेर; राजे लोकांच्या श्रीमंतीलाही टाकले मागे...
| Updated on: Oct 26, 2022 | 7:05 AM
Share

नवी दिल्लीः भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) हे ब्रिटनचे पंतप्रधान झाल्या नंतर आता सगळीकडे त्यांच्याच नावाचीच चर्चा आहे.कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून निवडून आलेले सुनक हे राजा चार्ल्स तिसरे यांच्यासमवेत मंगळवारी देशाचे पहिले भारतीय वंशाचे  (Indian origin) पंतप्रधान (Prime Minister) म्हणून पदभार स्वीकारतील. ब्रिटनमध्ये राजघराण्यातील प्रमुखांच्या औपचारिकतेनंतरच आणि त्यांच्या परवानगीनेच पंतप्रधान होण्याची परंपरा आहे. श्रीमंती, जीवनशैली आणि वैभव यासाठी ओळखले जाणारे हे राजघराणे आहे मात्र एका बाबतीत ऋषी सुनक आणि त्याचे कुटुंब या राजघराण्याच्याही पुढे आहेत, ते पुढे आहेत ते म्हणजे त्यांच्या श्रीमंतीसाठी.

ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत यशस्वी ठरलेले ऋषी सुनक हे त्यांच्या संपत्तीमुळे प्रचंड चर्चेत आले आहेत. त्यांच्या संपत्तीमुळेच ऋषी सुनक यांची गणना ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते.

इतकंच नाही तर त्यांची पत्नी अक्षता यांच्याकडेही ब्रिटनची राणी एलिझाबेथपेक्षा जास्त संपत्ती असल्याचे माध्यमांनी सांगितले आहे.

सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती ब्रिटनच्या 250 श्रीमंतांच्या यादीत 222 व्या स्थानावर आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटिश संसदेतील सर्वात श्रीमंत खासदार म्हणूनही त्यांची ओळख आहे.

पत्नी अक्षता यांच्याकडे 430 दशलक्ष पौंडची संपत्ती असून जी ब्रिटनची राणी एलिझाबेथ दुसरी यांच्यापेक्षाही जास्त संपत्ती आहे.

ऋषी आणि अक्षता यांची एकूण चार घरे आहेत. त्याची किंमत 15 दशलक्ष पौंड आहे. दोन घरं लंडनमध्ये आहेत. तर यॉर्कशायरमध्ये एक आणि लॉस एंजेलिसमध्ये एक आहे. यॉर्कशायरमधील त्यांचे घर 12 एकर परिसरात पसरलेले आहे.

सुनक आणि त्यांच्या पत्नीची एकूण संपत्ती 730 दशलक्ष पौंड आहे. तर त्याच वेळी, ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा 600 दशलक्ष पौंडांचा मालक आहे.

रिपोर्टनुसार, सुनक हे कुलपती असताना त्यांचा पगार 151,649 पौंड होता. राजकारणात येण्यापूर्वी सुनक यांनी इन्व्हेस्टमेंट बँकेत विश्लेषक म्हणूनही काम केले.

त्यांच्या उच्च पदामुळे त्यांचा पगार प्रचंड होता, परंतु इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर त्यांची संपत्ती झपाट्याने वाढली.

त्याच वर्षी स्थानिक प्रसारमाध्यमांनी अक्षता मूर्तीच्या वाढलेल्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित केले होते. ज्यामध्ये तो भारतीय असल्याचेही सांगण्यात आले होते.

त्यांच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व नाही. यामुळे ती इन्फोसिसच्या शेअर्सवर मिळणाऱ्या लाभांशावरील 20 दशलक्ष पौंडांचा कर वाचवत असल्याचे सांगितले जात आहे.

ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संपत्तीला राजकीय प्रतिस्पर्ध्यांनीही घेरले होते.

7 दशलक्ष पौंडांच्या आलिशान हवेलीमध्ये 4,00,000 पौंडांपेक्षा जास्त किमतीच्या आलिशान स्विमिंग पूलबद्दलच ऋषी सुनक अनेकदा चर्चेत आले होते.

ही बाब ब्रिटनमध्ये अनेकदा मांडण्यात आली आहे, मात्र या जोडप्याकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही.

राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.