ब्रेकिंगः जगाचं लक्ष आकाशात, चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब? भारतात लँडिंगची परवानगी मागितली…

सध्या हे विमान भारताच्या एअरस्पेसमधून पुढे निघाले आहे. मात्र विमानाने अद्याप कुठेही लँडिंग केलेले नाही.

ब्रेकिंगः जगाचं लक्ष आकाशात, चीनला जाणाऱ्या विमानात बॉम्ब? भारतात लँडिंगची परवानगी मागितली...
संग्रहित छायाचित्र Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Oct 03, 2022 | 1:11 PM

नवी दिल्लीः इराणहून चीनकडे (China) जाणाऱ्या एका विमानात बॉम्ब (Bomb in Plane) असल्याची बातमी समोर आली आहे. ही माहिती मिळताच विमानाने (Airplane) भारतात नवी दिल्लीत विमान लँड करण्याची परवानगी मागितली. मात्र भरताने ही परवानगी नाकारली.  त्यानंतर हे विमान पुढील प्रवासास निघाले असून सध्या भारतीय एअरस्पेसच्या बाहेर गेले असल्याची माहिती आहे. या विमानात बॉम्ब आहे का ते हायजॅक झाले आहे, यावर अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने ईराणमधील तेहरान येथून उड्डाण घेतलं होतं. त्यानंतर फ्लाइटमध्येच बॉम्ब असल्याची माहिती समोर आली.

बॉम्बची माहिती मिळाली तेव्हा विमान दिल्लीच्या आसपास होते. त्यामुळे पायलटने दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.

सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली एअरपोर्टने ही परवानगी नाकारली. त्यामुळे याच ठिकाणी खूप वेळ आकाशात घिरट्या घातल्यानंतर हे विमान पुढे निघून गेले.

सध्या हे विमान भारतातील एअरस्पेसच्या बाहेर गेले आहे.जयपूर विमानतळावर विमानाने लँडिंगची परवानगी होती. मात्र ती नाकारण्यात आली.

दरम्यान, संपूर्ण जगाचं लक्ष या विमानाकडे लागलेलं आहे. विमान हायजॅक केलंय का? अशीही शंका उपस्थित केली जातेय. भारतीय लायू सेनेने सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक पाऊल उचललं आहे.

भारतीय वायुसेनेने तडकाफडकी पंजाब आणि जोधपूर एअरबेसमधून एक सुखोई विमान पाठवले आहे. आकाशातील या संशयास्पद विमानावर आपले सुखोई विमान नजर ठेवून असेल.

मागील तीन तासांपासून हे विमान आकाशात आहे. सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास विमानाने दिल्लीत लँडिंगची परवानगी मागितली होती.

या विमानात बॉम्ब असल्याचा अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. महान एअरलाइन्सचे W-581 असे हे विमान चीनमधील ग्वांग्झू एअरपोर्टकडे जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.