AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हायवेवर थरार, थेट फुटबॉल टीमवर हल्ला! भीतीमुळे एक संघ स्पर्धेत उतरलाच नाही, अध्यक्षाने आधीच दिला होता इशारा…

फुटबॉलच्या सामन्यासाठी बसमधून निघालेल्या संघासोबत भयंकर किस्सा घडला आहे. यावेळी बसमध्ये तब्बल 20 खेळाडू होते. त्यांच्यासोबत इतरही प्रवासी होते. त्यांनाही यावेळी मारहाण करण्यात आली.

हायवेवर थरार, थेट फुटबॉल टीमवर हल्ला! भीतीमुळे एक संघ स्पर्धेत उतरलाच नाही, अध्यक्षाने आधीच दिला होता इशारा...
Karachi football teamImage Credit source: social media
| Updated on: Sep 29, 2026 | 4:53 PM
Share

फुटबॉलची टीम एका मोठ्या स्पर्धेसाठी जायला निघते. त्यानंतर टीम ज्या बसमध्ये असतेस त्या बसला महामार्गावर अडवले जाते आणि जे अडवतात ते सशस्त्र बंदुकधारी सराईत गुंड असतात. ही घटना अंगावर काटा आणणारी आहे ना. हा प्रसंग कोणत्याही सिनेमातील नसून खरीखुरी घटना आहे. ही घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. कराचीच्या एका फुटबॉल टीमबाबब ही घटना घडली असून या घटनेची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होते आहे. यावेळी सर्व खेळाडूंना धमकावण्यात आलं त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. त्यांच्याकडील रोख पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यात आल्या. एवढच नाही तर बसमध्ये जे इतर प्रवासी प्रवास करत होते. त्यांनाही या गुंडांनी सोडलं नाही. त्यांनाही जोरदार मारहाण करण्यात आली. त्यामुळे काही काळ त्याठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालं होतं. याबद्दलच वृत्त पीटीआयने दिलं आहे.

नेमकी काय घडलं?

कराचीचा संघ केट्टासाठी निघाला होता. यावेळी मस्तंग आणि सारियाब दरम्यानच्या बलुचिस्तान हायवेवर तोंडासा मास्क लावलेल्या आणि सशस्त्र असलेल्या गुंडाची टोळी बसच्या समोर आली. या टोळीने बसला घेराव घातला. या बसमध्ये तब्बल 20 फुटबॉलपटू होते. हा सर्व कराचीचा संघ मुख्यमंत्री गोल्ड कप स्पर्धेमध्ये सहभागी होणार होता पण त्यापूर्वीच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्याच्याकडील सर्व मौल्यवान वस्तू जप्त करण्यात आल्या. याबद्दलची माहिती संघाच्या व्यवस्थापकांनीही दिली आहे. त्यांनी घडलेल्या घटनेची हकिकत सांगताना आमच्यावर हल्ला झाल्याचे मान्य केलं आहे. या घटनेची माहिती क्रीडा मंत्र्यांनाही पोहचवली असल्याचे त्यांनी कळविले आहे.

दरम्यान, सिंध फुटबॉल असोशिएशनचे अध्यक्ष यांचं वक्तव्य ऐकून तर सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. त्यांनी सांगितलं की, सुरक्षेच्या प्रश्नामुळे आम्ही आवाहन केलं होतं की कोणीही बस किंवा ट्रेनने प्रवास करु नये, असं सांगितलं होतं. याच कारणाने आम्ही आमचा संघ या स्पर्धेमध्ये खेळायला पाठवला नाही. त्याचेच परिणाम आता कराचीच्या संघाला भोगावे लागत आहेत, असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानमध्ये सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर आहे, हेच या घटनेतून समोर आले आहे.

Follow Us
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला