News9 Global Summit 2025 : जर्मनीचा महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी मेगा प्लान; भारतीय कंपन्यांनाही अच्छे दिन येणार

न्यूज9 ग्लोबल समिट 2025 मध्ये जर्मनीने महाराष्ट्रात मोठ्या गुंतवणुकीची योजना जाहीर केली आहे. बाडेन-वुर्टेमबर्ग इंटरनॅशनलचे सीईओ गुन्नार मे यांनी सांगितले की, जर्मन कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवतील, ज्यामुळे भारतीय कंपन्यांना नवीन संधी मिळतील. फेब्रुवारी 2025 मध्ये एक मोठी ट्रेड मिशन यात्राही आयोजित केली जाणार आहे, ज्यामुळे दोन्हीकडील व्यवसायांना फायदा होईल.

News9 Global Summit 2025 : जर्मनीचा महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी मेगा प्लान; भारतीय कंपन्यांनाही अच्छे दिन येणार
News9 Global Summit 2025 Germany
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 09, 2025 | 5:47 PM

News9 Global Summit 2025 च्या दुसऱ्या पर्वाला आज पासून सुरुवात झाली आहे. जर्मनीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी बाडेन-वुर्टेमबर्ग इंटरनॅशनल GmbH (BW_i) चे सीईओ Gunnar Mey यांनी आपलं मत व्यक्त केलं. तुमच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. मी गेल्या आठवड्यातच नवीन जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वी मी अनेक वर्षापासून एक्झिबिशनच्या क्षेत्रात कार्यरत होतो, असं Gunnar Mey म्हणाले.

मला फुटबॉलचं वातावरण आणि खेळाची भाषा दोन्ही आवडतं. त्यामुळेच मी खिलाडीवृत्तीने तुमच्याशी संवाद साधणार आहे. तेव्हा, सर्वात आधी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना माझा हॅलो. त्याचबरोबर मला हे कोच सेशन सुरू करण्यासाठी संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद, अशी सुरुवातच Gunnar Mey यांनी केली.

महाराष्ट्रात जर्मनीच्या कंपन्या

बाडेन-वुर्टेमबर्गमध्ये मी माझ्या 100 सहकाऱ्यांसोबत संपूर्ण जोशात काम करत असतो. आपल्या प्रकल्पांना प्रमोट करणं हा आमचा हेतू आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना इथे गुंतवणुकीसाठी प्रेरित करणं आणि बाडेन-वुर्टेमबर्गच्या कंपन्या आणि विद्यापीठांना भारतासारख्या देशात, खासकरून महाराष्ट्रात नव्या संधीशी जोडण्यावर आमचा पहिला भर आहे. फेब्रुवारी 20265मध्ये आमच्या अर्थमंत्र्यांच्या नेतृत्वात दिल्ली, पुणे आणि मुंबईत एक मोठी ट्रेड मिशन यात्रा सुरू करण्यात येणार आहे, असंही Gunnar Mey यांनी सांगितलं.

बाडेन-वुर्टेमबर्ग इंटरनॅशनलचा बिझनेस काय?

बाडेन वुर्टेमबर्ग इंटरनॅशनल ही राज्यातील सर्वात मोठी मार्केटिंग एजन्सी आहे. आमचं मुख्यालय स्टुटगार्टच्यामध्ये आहे. तसेच चीनमध्ये सुद्धा आमचं कार्यालय आहे. त्यााशिवाय आम्ही बाडेन वुर्टेमबर्गच्या संपूर्ण एजन्सी नेटवर्कचा भाग आहोत. आम्ही सायंटिफिक रिसर्चला सहकार्य करतो. आम्ही शिक्षण आणि अर्थव्यवस्था दोन्हीसाठी डेलिगेशनचं आयोजन करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाडेन-वुर्टेमबर्ग भारतीय कंपन्यांचं हब

बाडेन वुर्टेमबर्ग भारतीय कंपन्यांचं हब आहे. सध्या भारतातील 70 टक्क्याहून अधिक कंपन्या या ठिकाणी काम करतात. ज्यात काहींची जर्मनीशी पार्टनरशीपही आहे. आणखी भारतीय कंपन्या बाडेन वुर्टेमबर्गमध्ये यावेत आणि त्यांनी गुंतवणूक करावी हे आमचं लक्ष्य आहे. रिसर्च आणि डेव्हल्पमेंट ही आमची स्ट्रेंथ आहे, हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत असेलच, असंही ते म्हणाले.