भारतासोबतचे संबंध आता नव्या उंचीवर, News9 Global Summit मध्ये जर्मनीचे परराष्ट्रमंत्री डॉ. जोहान वडेफुल यांनी व्यक्त केले मत!
News9 Global Summit 2025 मध्ये जर्मनीचे परराष्ट्रमंत्री डॉ. योहान वेडफुल (Johann Wadephul) यांनी भारत आणि जर्मनी यांच्यातील व्यापार, सांस्कृतिक देवाणघेवान यावर भाष्य केले. भविष्यात या दोन्ही देशांची भागिदारी वेगळ्या उंचीवर असेल, असेही ते म्हणाले.

टीव्ही 9 नेटवर्कच्या न्यूज 9 ग्लोबल समिटच्या जर्मनी एडिशन-2025 ला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी आपल्या भाषणात उपस्थितांचे स्वागत केले. तसेच त्यांनी भारत आणि जर्मनीचे संबंध मजबूत आहेत, असे मत व्यक्त केले. त्यांच्या भाषणानंतर जर्मनीचे परराष्ट्रमंत्री डॉ. योहान वेडफुल (Johann Wadephul) यांनीही भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांतील 25 वर्षांच्या धोरणात्मक भागीदारी तसेच 60 वर्षांपासूनच्या सांस्कृतिक संबंधावर भाष्य केले. दोन्ही देशांतील अनेक वर्षांपासूनचे संबंध हा फक्त आकडा नाही, तर हुआयामी संबंधांचे हे प्रतिबिंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर, वाणिज्यमंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत झालेल्या चर्चा या भविष्यातील भागिदारीसाठी प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारत-जर्मनीच्या भागिदारीची सुरुवात कधीपासून झाली?
आपल्या भाषणात योहान वेडफुल यांनी भारत-जर्मनीचे संबंध कधीपासून आहेत, याविषयी भाष्य केले. भारत आणि जर्मनी यांच्यातील भागिदारीची सुरुवात 2000 सालापासून झाली. त्या काळात जगाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा इंटरनेट नवे होते. बर्लिनची भिंत पाडून अवघे काही वर्षे झाले होते. भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणेची लाट आली होती. तेव्हा जर्मिनीची तांत्रिक क्षमता आणि औद्योगिक ताकद आणि भारताची उद्यमशीलता आणि युवकांची उर्जा यांना एकत्र आणण्याचा विचार जन्माला आला. आज हाच विचार सत्यात उतरताना दिसतोय.
जर्मनी भारताचा सर्वात मोठा भागिदार
सध्या भारत जर्मनीसाठी आशिया खंडातील प्रमुख भागिदार देश झाला आहे. युरोपीय संघात जर्मनी हा भारताचा सर्वात मोठा व्यापारविषयक भागिदार आहे. गेल्या काही वर्षामता भारत आणि जर्मनी यांच्यात 31 अब्ज युरोंचा व्यापार झाला. येणाऱ्या काही वर्षांत हा आकडा दुप्पट करण्याचे लक्ष्य दोन्ही देशाांचे आहे. त्यासाठी भारत आणि युरोपीय संघ यांच्यातील फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर काम चालू आहे. हा करार अस्तित्ताव आला तर व्यापाराला चालना मिळेल. जर्मनीच्या तंत्रज्ञानाने भारतात उर्जा, पायाभूत सुविधा, पर्यावरण यासारख्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे, असेही वेडफुल यावेळी म्हणाले.
25 वर्षात दोन्ही देशांतील सहकार्य वेगळ्या उंचीवर
तसेच आपल्या भाषणात जर्मनीला भारतासोबतचे संबंध कायम राखणे गरजेचे असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. दोन्ही देशांतील भागिदारी ही लोकशाही, मानवाधिकार, शास्वत विकास या मूल्यांवरदेखील आधारलेली आहे. दोन्ही देश जागतिक मंचावर एकत्र मिळून जलवायू बदल, क्षेत्रीय संघर्ष, डिजिटल युगातील आव्हान यांचा सामना करत आहे, असे सांगायलाही वेडफुल विसरले नाहीत. तसेच येणाऱ्या 25 वर्षात जर्मनी आणि भारत यांच्यातील भागिदारी ही वेगळ्या उंचीवर असेल असेही ते म्हणाले.
