अफगाणिस्थानात आता महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स नाही, गाडी चालवणे महिलांचे काम नाही, तालिबानचा नवा फतवा

महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नका, असे सांगण्यात आले आहे.

अफगाणिस्थानात आता महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स नाही, गाडी चालवणे महिलांचे काम नाही, तालिबानचा नवा फतवा
Taliban ban on women driving
Image Credit source: TV9
सिद्धेश सावंत

|

May 04, 2022 | 6:05 PM

काबूल – अफगाणिस्थानात तालिबानी सरकारने (Taliban fatwa)महिलांचे अधिकार मर्यादित करण्यासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे. अफगाणिस्थानच्या हेरात शहरात महिलांना कारचे ( women in Afghanistan)ड्रायव्हिंग लायसन्स (driving license) देऊ नये, असे फर्मानच सरकारी अधिकाऱ्यांनी काढले आहे, हे फर्मान सर्व ड्रायव्हिंग लर्निंग आणि लायसन्स देणाऱ्या संस्थांना देण्यात आले आहेत. अफगाणिस्थानात यापूर्वीही अनेकदा महिलांवर वेगवेगळ्या क्षेत्रात बंदी घालण्यात आली आहे. हेरात शहरात ड्रायव्हिंग करणाऱ्या महिलांची संख्या यापूर्वीच कमी होती. अफगाणिस्थानात तालिबान सत्तेत आल्यानंतर महिलांची अवस्था दिवसेंदिवस अधिकाधिक खडतर होताना दिसते आहे. ज्या महिला यापूर्वी ड्रायव्हिंग करत होत्या, त्यांचा हा अधिकारही आता काढून घेण्यात आला आहे.

महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया

या प्रकरणात सरकारकडून लेखी आदेश मिळाले नसले तरी, तोंडी आदेश देण्यात आले आहेत, ज्यात महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देऊ नका, असे सांगण्यात आले आहे. या निर्णयावर हेरात शहरातील महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका महिलेने सांगितले की – आमच्या पुढच्या पीढीला आम्हाला मिळालेले अधिकार मिळू नयेत, अशी तालिबान सरकारची इच्छा आहे. त्यांना या सगळ्याचा आनंद मिळू नये, यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्या कुणाच्या मागे कारमध्ये बसण्यापेक्षा स्वता ड्रायव्हिंग करणे, हे जास्त सुरक्षित असल्याचे मतही व्यक्त होते आहे.

महिलांच्या अधिकारांवर घाला

सत्तेत आल्यानंतर देशात महिलांच्या अधिकारांचं हनन करणार नाही, असे तालिबानने सांगितले होते. इस्लामच्या कक्षेत राहून त्यांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात दररोज तालिबान महिलांच्या अधिकारांचे खच्चीकरण करत असल्याचे दिसते आहे. शाळांमध्ये मुलींनी शिक्षण घेवू नये, सरकारी कार्यालयात महिलांनी येवू नये, असे आदेश यापूर्वी काढण्यात आले आहेत. एकूणच तालिबान त्याच्या कट्टरवादी मानसिकेतून बाहेर येताना दिसत नाहीये.

एकट्याने विमान प्रवासावरही महिलांना बंदी

मार्चमध्ये महिलांनी एकट्याने विमान प्रवास करु नये, असे आदेशही तालिबान सरकारने दिले होते. पती किंवा अन्य पुरुष सोबत असतानाच त्यांनी विमान प्रवास करावा असा फतवा काढण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

 

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें